एक्स्प्लोर

Bhusawal Vidhan Sabha Result 2024: भुसावळमध्ये अखेर कमळ फुललं! संजय सावकारेंना मिळाला जनतेचा कौल, जनतेने सोडली कॉंग्रेसची साथ?

Bhusawal Vidhan Sabha Constituency: 2019 मध्ये संजय वामन सावकारे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील राजकारण बदलले. सावकारे भाजपच्या तिकिटावर गेले दोन वेळा येथून निवडणूक जिंकलेत.

Bhusawal Vidhan Sabha Constituency: यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) खऱ्या अर्थाने रंजक ठरली. जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात रणधुमाळी दिसून आली, राज्यातील 288 जागांपैकी भुसावळ (Bhusawal Vidhan Sabha Constituency) मतदारसंघाची सध्या सर्वत्र चर्चा होती. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी भुसावळ विधानसभा जागा 12 व्या क्रमांकावर आहे. ही जागा दीर्घकाळापासून भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे विजयी झालेत तर कॉंग्रेसच्या राजेश मानवतकरांना पराभवाचा सामना करावा लागलाय. 

भाजपचं कमळ फुललं..!

भुसावळ विधानसभा मतदारसंघ - जळगाव जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. कारण भुसावळमध्ये भाजपाचे आमदार संजय सावकारेयांनी अखेर गड राखला आहे. तर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात कमालीचा फरक पडला. जुने पक्ष नव्या नेतृत्वाखाली आणि नवीन पक्ष जुन्या नेतृत्वाखाली कमांडवर होते. मात्र, यावेळी राज्यात महायुती- महाविकास आघाडी आमनेसामने येणार असल्याने यंदा या निवडणूकीची रंजक झलक पाहायला मिळाली

सावकारेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकारण बदलले

केळींसाठी देशभरात प्रसिद्ध असलेली भुसावळ विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपचे संजय वामन सावकारे यांच्याकडे आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. 2004 आणि 2009 मध्ये राष्ट्रवादीने येथून निवडणूक जिंकली होती. पण, 2014 मध्ये येथील राजकारणाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलले. 2019 मध्ये संजय वामन सावकारे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने येथील राजकारण बदलले. सावकारे भाजपच्या तिकिटावर गेल्या दोन वेळा येथून निवडणूक जिंकत आहेत.

गेल्या निवडणुकीत काय झाले?

भुसावळ विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, संजय वामन सावकारे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार मधु राजेश मनवटकर उभे होते, तर राष्ट्रवादीचे जगन देवराम सोनवणे त्यांच्या विरोधात उभे होते. या निवडणुकीत भाजपचे संजय यांना एकूण 81,689 मते मिळाली. तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी मधु राजेश मनवटकर यांना 28,675 मते मिळाली. राष्ट्रवादीचे जगन देवराम तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 20,245 मतांवर समाधान मानावे लागले.

मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?

महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.

हेही वाचा>>>

Muktainagar Vidhan Sabha Constituency: मुक्ताई नगरमध्ये खडसे राखणार का गड? की चंद्रकांत पाटलांचा विजय होणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget