एक्स्प्लोर

Bhiwandi West Vidhan Sabha : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ : महेश चौगुले तिसऱ्यांदा बाजी मारणार की दयानंद चोरगे बाजी पलटणार?

Bhiwandi West Assembly Constituency Election 2024 : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश चौघुले आणि काँग्रेसचे दयानंद चोरगे यांच्यात लढत आहे.

Bhiwandi West Vidhan Sabha Election 2024 : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे. 2014 च्या निवडणुकीत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश चौघुले आणि काँग्रेसचे दयानंद चोरगे यांच्यात लढत आहे. महेश चौघुले हे भाजपच्या तिकीटावर सलग दोन वेळ निवडून आले असून भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. महेश चौगलुने यांना यंदा गड राखण्याचं आव्हान आहे.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ

2009 च्या मतदारसंघाच्या फेररचनेनंतर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली, त्यावेळी भिवंडीचे विधानसभेचे पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे भाग झाले. हा मतदारसंघ समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा गड मानला जातो. भिवंडी पश्चिम मतदारसंघात बहुभाषिक आणि मुस्लिम मतदार सर्वाधिक आहे. 2014 च्या निवडणुकीत भिवंडी पश्चिम मतदारसंघावर भाजपने झंडा रोवला. 1990 पासून समाजवादी पक्षाचा गड राहिलेला भिवंडी विधानसभा मतदारसंघ 2014 साली भाजपच्या ताब्यात गेला. आतापर्यंत भिवंडी मतदारसंघात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. 1990 नंतर एकदा शिवसेना सोडल्यास आजवर इथे समाजवादी पार्टी आणि नंतर काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.

भौगोलिक रचना

भिवंडी पश्चिम मतदारसंघात भिवंडी शहरासह गावाचाही समावेश होतो. यामध्ये 40 टक्के मतदार हा मुस्लिम आहे तर उर्वरित मतदार हा हिंदू असून आगरी, गुजराती, राजस्थानी, जैन, तेलुगू आणि उत्तर भारतीय असा विभागला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणचा इतिहास पाहता आजपर्यंत भिवंडीतल्या निवडणुका या थेटपणे हिंदू-मुस्लिम अशाच झालेल्या आहेत.

सद्यस्थिती

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजप-शिवसेना युतीच्या पारंपरिक जागा वाटपात शिवसेनेच्या ताब्यात होता. 2014 साली दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि मोदी लाटेत ही जागा भाजपने जिंकली. या ठिकाणाहून भाजपचे महेश चौगुले निवडून आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादीने आपापले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण, भाजपचे महेश चौगुले 42,483 मते घेऊन विजयी झाले. 2019 मध्येही भाजपच्या तिकीटावर महेश चौघुले 58857 मतांनी विजयी झाले.

मतदारसंघातील समस्या

भिवंडी उद्योग शहर म्हणून नामांकित आहे, पण हीच याची कमजोरी ठरत आहे. येथील असंघटीत उद्योग, त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसणं ही मोठी समस्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील बिझनेस पार्कची मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. सोबतच रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी पासून सुटका करण्यात नेतृत्व अपयशी ठरलं असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती

  • महेश चौघुले (भाजप)
  • दयानंद चोरगे (काँग्रेस)

भिवंडी पश्चिम विधानसभा 2019 चा निकाल

  • महेश चौघुले (भाजप) - 58857 मते (विजयी)
  • गुड्डू खालिद (काँग्रेस) - 43945 मते

भिवंडी पश्चिम विधानसभा 2014 चा निकाल

  • महेश चौघुले (भाजप) - 42483 मते (विजयी)
  • अश्फाक शोएब खान (काँग्रेस) - 39157 मते

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhiwandi East Vidhan Sabha : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ : रईस शेख 'बादशाह' ठरणार की, संतोष शेट्टी बाजी मारणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Embed widget