मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल, ठाकरे गटाच्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना आवाहन
भाजपच्या नादाला लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल असे आवाहन भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.
Bhaskar Jadhav on Eknath Shinde : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची सध्या जोरजार चर्चा सुरु आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. तर दुसऱ्या बाजुला भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढवत आहे. दरम्याच याच मुंबई महापालिकेच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या नादाला लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल असे आवाहन भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे. ते कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबई महापालिकेची जोरदार चर्चा
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सध्या राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सोबतीला शरद पवार यांच्या पक्षाची देखील साथ मिळाली आहे. तर त्यांना भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं आव्हान दिलं आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुंबऊत एकनाथ शिंदे च्या यांच्या शिवसेनेने भाजपला साथ दिली आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. याच मुद्यावरुन भास्कर जाधव यानी म्हत्वाचं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या नादाला लागून मुंबई भाजपच्या हातात देऊ नका, तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल असे आवाहन भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना केलं आहे. त्यांच्या या मुद्यावर आता एकनाथ शिंदे काही प्रतिक्रिया देणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नाशिकमध्येही उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
भाजपचं हिंदुत्व हे खरं आहे की चुनावी आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटला आणि प्रभू रामचंद्र जिथं तपश्चेला बसले होते, तेथील सगळी झाडं जर कापली तर आम्ही काय सांगणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला. देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं. पण ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत ते आमची पोरं दत्तक घेतायेत ते काय शहरं दत्तक घेणार? असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. भाजप हा उपटसुंभांचा पक्ष झाला आहे. आमचं व्यासपीठ हाऊसफुल आहे. आमच्याकडे पोरांचा तोटा नाही. मोठे केलेले गेली असतील पण ज्यांनी मोठं केलं ती माणसं सोबत असल्याचे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:




















