एक्स्प्लोर

काँग्रेसने विश्वासघात केलाय, छत्रपतींसमोर दिलेला शब्द मोडला, रामटेकच्या जागेवरून भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले

Maharashtra Assembly Elections : रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केलीय, तर मुळक यांच्या बंडखोरी मागे सुनील केदार आहेत, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

नागपूर :  रामटेक विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)अशी लढाई इथे आहे. तर महाविकास आघाडी म्हणून विशाल बरबटे हे नक्कीच जिंकणार आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी येथे बंडखोरी केलीय. लोकसभा निवडणूकीत या भागात काँग्रेसच्या उमेदवाराला रक्ताचं पाणी करुन जिंकून आणलं, पक्ष बघीतला नाही. रामटेकची (Ramtek Assembly Constituency) जागा शिवसेनेची होती,  मात्र एका शब्दात पक्षप्रमुखांनी ती जागा काँग्रेसला दिली. मी इथे बरबटे यांचा प्रचार करायला आलोय. तर इथे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बंडखोरी करताय. तर  काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरी मागे सुनील केदार आहेत. राजेंद्र मुळक यांचा अर्ज भरायला जातो. तुम्ही माणसं आहात की जनावरं आहेत.  रामटेकच्या जागे बाबत काँग्रेसने विश्वासघात केलाय अशा तीव्र शब्दात राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. 

सुनील केदार यांनी छत्रपतींसमोर दिलेला शब्द तुम्ही तोडला

पूर्व विदर्भातील एक जागा रामटेकची आम्ही लढवली. एक जागा लढवावी येवढीच आमची ताकद आहे का? शिवसेनेसोबत टक्कर घेणाऱ्याला माती दाखवलीय. शिवसेनेच्या स्वाभिमानाला धक्का लावू नका. एकदा शिवसैनीक पेटून उठला तर तो कुणाच्या बापाला ऐकणार नाही. सुनील केदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर शब्द दिली की, सहाही जागा महाविकास आघाडीच्या जिंकू. छत्रपतींसमोर दिलेला शब्द तुम्ही तोडला. राजेंद्र मुळक यांना सुनील केदार यांनी कामठीतून का उभं केलं नाही? सुनील केदार यांच्यावर बँकेच्या घोटाळ्याचे आरोप आहे. सुनील केदार यांनी सावनेरची जागा पत्नीला देण्याऐवजी राजेंद्र मुळक यांना का दिली नाही? तेव्हा तुम्ही नेता म्हणून तुमचं कौतुक केलं असतं. मात्र, नियती सुनील केदार यांना धडा शिकवणार. काँग्रेसच्या लोकांना विनंती इथे व्यक्ती नाही महाविकास आघाडी मोठी आहे.असेही भास्कर जाधव म्हणाले. 

काँग्रेसने विश्वासघात केलाय- भास्कर जाधव

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुनील केदार यांना मंत्री होता येत नाही. म्हणून सुनील केदार यांच्या पोटात पाप आहे. की स्वत: मंत्री होता येत नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये, म्हणून तो प्रयत्न करु. अनेक मतदारसंघात त्यांचे हे प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांचा हेतू चांगला नाही. काँग्रेसने विश्वासघात केला. राजेंद्र मुळक यांना शोकेसमधून बाहेर काढल्यासारखा आहे. अशी टीकाही भास्कर जाधव काँग्रेसवर केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget