एक्स्प्लोर
निवडणूक कोण जिंकणार? यावर लावलेली पैज महागात, दोघांविरोधात जुगाराचा गुन्हा दाखल
या निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये चुरशीने लढत झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकणार यावरून एक लाखाची पैज लावणे मिरजेतील दोघांने चांगलेच महागात पडले आहे. या दोघांवर जुगाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील विजयी होणार की विशाल पाटील विजयी होणार? यावरून मिरजेतील दोघा समर्थकांनी एक लाख रुपयांची पैज लावली होती. इतकंच नाही तर त्यांनी या पैजेसाठी नोटरीही करून घेतली होती.
निवडणूक कोण जिंकणार यावर एक लाखाची पैज, चक्क नोटरी करत निकालानंतरच्या तारखेचे चेक दिले
याप्रकरणी भाजपकडून पैज लावणारे राजकुमार लहू कोरे (रा. विजयनगर) आणि स्वाभिमानीकडून पैज लावणारे रणजित लालासाहेब देसाई (रा. शिपूर) या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी 23 रोजी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये चुरशीने लढत झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सांगलीतल्या चहा टपऱ्यांवर, चावडीवर, पारावर आणि जिथे लोक जमतील तिथे सांगलीचा खासदार कोण होणार याचीच चर्चा सुरु आहे. कोण म्हणतं संजय पाटील निवडणूक येणार, कोण म्हणतं विशाल पाटील येणार तर कोण म्हणतं गोपीचंद पडळकर येणार. अशाच एका रंगलेल्या चर्चेदरम्यान स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि भाजपाचे संजय पाटील यांचे कार्यकर्ते असणाऱ्या मिरज तालुक्यातील या दोघा मित्रांनी आपलाच नेता विजयी होणार असा दावा ठोकला. त्यानंतर दोघांनी चक्क एक लाख रुपयांची पैज लावली. मिरजेच्या मार्केट कमिटीमध्ये कामानिमित्त कोरे आणि देसाई भेटले होते. सांगलीचा खासदार कोण होणार याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर या दोघांनी 1 लाख रुपयांची पैज लावली. इतकंच नव्हे तर उद्या यामध्ये कोणताही बदल होऊ नये, यासाठी दोघांनी चक्क कायदेशीर ग्राह्य मानली जाणारी नोटरी करुन टाकली. तसेच निकालानंतरच्या तारखेचे म्हणजेच 24 मे 2019 या तारखेचे एकमेकांच्या नावाचे चेकही देऊन टाकले आहेत. मात्र या दोघांनी स्वतःच्या फायद्याकरीता पैज लावून शंभरच्या स्टॅम्पवर सह्या केल्या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस हवालदार चंद्रकांत वाघ यांनी फिर्याद दिली आहे. राजकुमार कोरे आणि रणजित देसाई यांच्याविरुद्ध जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैज लावल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने मिरज तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement