एक्स्प्लोर

Beed Gram Panchayat Election 2026: बीडमध्ये 88 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, मस्साजोगची निवडणूक बिनविरोध होणार? धनंजय देशमुख म्हणाले, संतोष अण्णांचे स्वप्न...

Beed Gram Panchayat Election 2026: बीड जिल्ह्यात आजपासून 88 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू होतेय. यात केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Beed Gram Panchayat Election 2026: बीड (Beed) जिल्ह्यात आजपासून 88 ग्रामपंचायतीची (Gram Panchayat Election 2026) रणधुमाळी सुरू होतेय. यात केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे (Massajog Gram Panchayat Election 2026) राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात 16 ठिकाणी सरपंच तर 72 ठिकाणी सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून 28 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्य, सरपंचाचे निधन, राजीनामा किंवा अपत्रातेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या एकूण 88 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. आजपासून निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार 13 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतील. 29 एप्रिल रोजी मतमोजणी झाल्यानंतर या ग्रामपंचायतीचा निकाल घोषित केला जाणार आहे. 

Massajog Gram Panchayat Election 2026: मस्साजोग येथील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष 

या ८८ ग्रामपंचायतीपैकी मस्साजोग येथील निवडणुकीकडे लक्ष असणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झालेल्या घटनेला वर्ष पूर्ण होतंय. त्यामुळे पोटनिवडणुकीत मस्साजोग गावाचा ही समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी कोण निवडणूक लढविणार किंवा ही निवडणूक बिनविरोध होणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

Massajog Gram Panchayat Election 2026: गावकऱ्यांच्या विचारावर आम्ही थांबलेलो आहोत

दरम्यान, मस्साजोग ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांनी जे काम केलं आहे, तोच मानस गावकऱ्यांचा असणार आहे. गावकऱ्यांच्या विचारावर आम्ही थांबलेलो आहोत. येणाऱ्या दोन-तीन दिवसात काही गोष्टी स्पष्ट होतील. आजी-माजी सदस्य पॅनल प्रमुख गावकऱ्यांची बैठक झाली. यात निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा झाली. 

Massajog Gram Panchayat Election 2026: निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस

18 महिन्यांचा उरलेला कालावधी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध करण्याचा मानस आहे. गावाच्या विकासासाठी टीम वर्कची गरज असते. स्वर्गीय देशमुखांनी पंधरा वर्ष गावासाठी घातले आहे. या निवडणुकीसाठी शक्यतो  मी उमेदवार नाही. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा आणि बाजार समितीच्या सदस्यपदाचा अनुभव आहे. त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांनी बैठक घेतलेली आहे.येत्या एक-दोन दिवसात निवडणूक बिनविरोध कशी होईल? हा गावकऱ्यांचा प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

Dhananjay Deshmukh: मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची 

धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. पण, मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची आहे. मला केसला वेळ द्यायचा आहे. मला कुठला दबाव नाही. मला कुठली अपेक्षा नाही आणि भीतीही नाही. येत्या दोन-तीन दिवसात आम्ही सर्वजण बसून तोडगा काढणार आहोत. देशमुख कुटुंबावर आलेले संकट कुणी संधी म्हणून बघू नये. उरलेल्या कालावधीत संतोष अण्णांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

Beed Gram Panchayat Election 2026: तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणूक

बीड - 11

परळी - 11

आष्टी - 11

माजलगाव - 9

गेवराई - 8

अंबाजोगाई - 5

धारूर - 7

पाटोदा - 7

शिरूर - 4

आणि वडवणी - 1

16 सरपंच तर 72 सदस्य अशा एकूण 88 जागेसाठी ही निवडणूक होतेय.

आणखी वाचा 

मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीकडं राज्याचं लक्ष, निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात, कसा असेल कार्यक्रम

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget