(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ajit pawar vs yugendra pawar: मतमोजणीच्या पहिल्या कलात अजित पवारांना धक्का, बारामतीतून युगेंद्र पवार आघाडीवर!
ajit pawar vs yugendra pawar: सुरूवातीला पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत असून अवघ्या काही मिनिटांत पहिला कल हाती येणार आहे.
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) चर्चा आहे. या निवडणुकीत बारामती (Baramati Election Result) हा मतदासंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या जागेवरून कोण बाजी मारणार, याचे संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचे आहे. दरम्यान, आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीदरम्यान बारामती मतदारसंघाचा पहिला कल हाती आला आहे. मतमोजणीच्या पहिल्याच कलात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे आघाडीवर आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले होते. त्यानंतर आज आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत झाली असून अवघ्या काही क्षणात पहिला कल हाती आला आहे. बिग फाईट असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर युगेंद्र पवारांची (Yugendra Pawar) आघाडी असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर आहेत. 2600 मतदान पोस्टलच्या माध्यमातून नोंद झाली आहे.
बारामती मतदारसंघाचा निकाल पुढच्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. त्याआधी मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. या पहिल्याच कलात युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली आहे. या जागेवर युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पहिल्याच कलात युगेंद्र पवार आघाडीवर असल्यामुळे अजित पवार पिछाडीवर गेले आहेत. सध्या मतमोजणी चालू असल्यामुळे क्षणाक्षणाला कल बदलत आहे. त्यामुळे सध्याजरी पहिल्या कलात युगेंद्र पवार आघाडीवर असले तरी मतमोजणीच्या नंतरच्या फेऱ्यांत अजित पवार हे आघाडीवर राहतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन्ही पवारांनी लावली होती पूर्ण ताकद
बारामती मतदारसंघात जिंकण्यासाठी अजित पवार तसेच शरद पवार यांच्या पक्षाने पूर्ण ताकद लावली होती. शरद पवार यांनी आपली शेवटची सभा याच मतदारसंघात घेतली. दुसरीकडे अजित पवार यांनीदेखील गावोगावी जाऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला विकास हवा असेल तर मला मतदान करा, असे आवाहन अजित पवार करत होते. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्यासारख्या तरूणाला बारामतीत विकास करण्याची संधी द्या, असे आवाहन शरद पवार करताना दिसत होते.
बारामतीत मतमोजणीच्या 20 फेऱ्या
दरम्यान, सध्या मतमोजणी चालू आहे. बारामतीत मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्या होत आहेत. सध्यातरी पहिल्याच फेरीतील मतमोजणी चालू आहे. पुढच्या काही तासांत बारामती मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल.