एक्स्प्लोर

जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा, बीडची निवडणूक वनसाईड, मी 100 टक्के जिंकणार : बजरंग सोनवणे

Beed Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी मीच निवडून येणार, असा दावा केलाय.

Bajrang Sonwane : बीड लोकसभा मतदारसंघात (beed Lok Sabha Constituency) काटे की टक्कर पाहायला मिळाली. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Exit Poll 2024) काल समोर आले. यात बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाचा मला फायदा होणार आहे.  बीडची निवडणूक वनसाईड झाली आहे. त्यामुळे माझा 100 टक्के विजय होणार, असा दावा त्यांनी केला आहे.  

बजरंग सोनवणे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील निवडणूक ही विकासावरच झाली. जातीपातीची नुसती चर्चा झाली. महाराष्ट्राचा जो मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तोच मूड बीड जिल्ह्यात सुद्धा आहे. हे सर्वे कसे करतात काय करतात याबाबत मला माहीत नाही. पण, मी बीड लोकसभा निवडणुकीतून शंभर टक्के निवडून येणार आहे, असे त्यांनी म्हटले.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा

ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा फायदा जरी मला झाला असला तरी मला सगळ्या समाजाने मतदान केले. मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. मी या निवडणुकीत कोणत्याही नेत्याविरोधात वैयक्तिक आरोप केले नाहीत. पण माझ्यावर जे वैयक्तिक आरोप झाले त्याला मला उत्तर द्यावं लागेल. वैयक्तिक आरोप प्रत्यारोप ऐकायला बरे वाटतात. त्यामुळे कुणालाही मते पडतात, असे अजिबात नाही. मी या निवडणुकीत उमेदवारी घेतल्यानंतर होणाऱ्या परिणामाचा विचार केला नाही. यापूर्वी सुद्धा माझ्यावर काय परिणाम झाला हे सगळ्यांना माहीत आहे. फक्त हे परिणाम अगदी घराच्या चुलीपर्यंत येऊ नयेत, एवढीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले. 

बीडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या होत्या. तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील बड्या नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. आता या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याचे चित्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे. 

आणखी वाचा 

'मोदींसारख्या तपस्वी, ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे', संजय राऊतांचा टीकेचा बाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget