Assembly Election 2023 : 'इंडिया' आघाडीत वाद! रायबरेली आणि अमेठीत काँग्रेसचा डाव बिघडणार? राहुल-सोनिया यांच्या जागेबाबत प्रश्नचिन्ह
Election News : मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीचा पाया डगमगला आहे. सपा आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा परिणाम यूपीमध्येही दिसून येत आहे.
Assembly Election 2023 : केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) विरोधात लढा देण्यासाठी देशातील 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडी (INDIA Alliance) ची स्थापना केली होती. मात्र, या इंडिया आघाडीचा पाया आता डगमगताना दिसत आहे. पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनी (Assembly Election 2023) 2024 च्या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) साठी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीला खिंडार पाडलं आहे. विधानसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीत वाद असल्याचं समोर आलं आहे. आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांच्या जागांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निवडणुकीआधी 'इंडिया' आघाडीत वाद समोर
2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ असला तरी मध्य प्रदेशात काँग्रेस आणि सपा यांच्यातील वादानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जागांवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पहिला प्रश्न म्हणजे, 2024 मध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून येतील का? जर, तसं असेल तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार की इतर कोणत्या जागेवरून नशीब आजमावणार? दुसरा प्रश्न म्हणजे राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार की वायनाडला परतणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
सोनिया गांधींची जागा अडचणीत?
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील जागावाटपावरून मध्य प्रदेशात सुरू झालेल्या वादाचा परिणाम आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. मध्य प्रदेशातील जागांवरून अखिलेश यादव आणि कमलनाथ यांच्यात तणाव दिसत आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींच्या जागेवरही होऊ शकतो, असं मानलं जात आहे.
"सबको एहसास हो गया है कि जब तक पिछड़े, दलित और आदिवासी, अल्पसंख्यक भाइयों का साथ नहीं लेंगे तब तक आप कामयाब नहीं होंगे।"
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 20, 2023
- माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी, हरदोई pic.twitter.com/EfhHqUuvqw
समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा परिणाम उत्तर प्रदेशमध्येही दिसून येत आहे. अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी हे संकेत दिले आहेत. काँग्रेसच्या महत्त्वाच्या जागांबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सोनिया गांधी या रायबरेलीच्या खासदार आहेत आणि गेल्या वेळी सपाने या जागेवर आपला उमेदवार उभा केला नव्हता.
महत्वाच्या इतर बातम्या :