एक्स्प्लोर
Advertisement
सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवतंय, अशोक चव्हाणांची खदखद
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. दोन्ही सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस असलेल्या ठिकाणची विकास कामं रोखत आहेत. सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा अशोक चव्हाणांनी केला
नांदेड : सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे, तेव्हा विचारपूर्वक मतदान करा, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकांमधील नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मतदारांना केलं आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. दोन्ही सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस असलेल्या ठिकाणची विकास कामं रोखत आहेत. सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे. पण मी तुमचा आहे, मी तुमच्यातच राहणार आणि तुमच्यातच मरणार, अशी भावनिक साद अशोक चव्हाणांनी घातली. नांदेडमधील भोकरमध्ये आयोजित सभेत चव्हाण बोलत होते.
पक्षातील एखादा कार्यकर्ता चुकीचं वागत असेल, तर मी निवडणुकीनंतर त्यांना शिक्षा करेन, पण तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढू नका, त्यांच्यावरील रागाची शिक्षा मला देऊ नका, असंही आवाहन अशोक चव्हाण यांनी आपल्या होमपिचवर केलं. त्यामुळे चव्हाणांच्या स्वपक्षाकडेही रोख दिसून आला.
लोकसभा निवडणूक लढवण्यास अशोक चव्हाण फारसे उत्सुक नव्हते. मात्र प्रदेशाध्यक्षांनीच निवडणूक लढवली नाही, तर चुकीचा संदेश जाईल, या विचाराने चव्हाणांना निवडणूक लढवण्याचे आदेश हायकमांडनी दिले. 2014 साली राज्यात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते. अशोक चव्हाण हे पुन्हा रिंगणात उतरलेले काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यात निवडणूक लढवतानाच पक्षाची इभ्रत वाचवण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement