Andheri Bypoll Election: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल ठाम, तर बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांवर दबाव वाढला
Andheri Bypoll Election : अंधेरी विधानसभा निवडणूक जिंकू शकू असा विश्वास आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केला आहे.
![Andheri Bypoll Election: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल ठाम, तर बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांवर दबाव वाढला Ashish Shelar and Murji Patel adamant on contesting Andheri Bypoll Election pressure on Fadnavis for unopposed election Andheri Bypoll Election: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढण्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल ठाम, तर बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांवर दबाव वाढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/17/c45124c4a8ef956853fa2f7dbb028daa166597534040689_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Andheri Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर उमटलाय. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. शेलार आणि पटेल यांनी निवडणूक जिंकू शकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केलाय. आता केंद्रीय नेतृत्व काय निर्णय घेतेय याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.
राज ठाकरे आणि शरद पवारांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटलं. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील एकनाथ शिंदेंना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा शरद पवारांनी दाखवला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या अंधेरी पोटनिवडणुकीतील भूमिकेवरुन आभार मानलेत. राज ठाकरे यांच्या पत्राचा विचार करु, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती.
अंधेरी पोटनिवडणुकीतील पवारांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
शरद पवारांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला. त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला मात्र न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेल आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा शरद पवारांनी दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांच्या बद्दल सदैव आभारी राहील.
शरद पवारांनी काय म्हटलं होतं...
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्रत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)