Arunachal Pradesh : अरूणाचलमध्ये भाजपची धडाकेबाज सुरूवात, मुख्यमंत्र्यांसह पाच उमेदवार बिनविरोध विजयी
Arunachal Pradesh Assembly Election : अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांच्यासह एकूण पाच उमेदवारांची विधानसभेसाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर येत आहे
इटानगर : एकीकडे लोकसभेत '400 पार'चा नारा देणाऱ्या भाजपने अरूणाचल विधानसभेत (Arunachal Pradesh Assembly Election) धडाकेबाज सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांच्यासह एकूण पाच उमेदवारांची विधानसभेसाठी बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर येत आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिल रोजी विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान होणार असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला आहे.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली. अरूणाचल प्रदेशच्या या निकालावरून देशाचा मूड लक्षात येतो असं ते म्हणाले.
Arunachal Pradesh leads in showing the mood of the nation. On the last day of the nomination filing for the Assembly election, BJP has secured 5 candidates elected unopposed led by CM @PemaKhanduBJP ji from 3-Mukto Assembly Constituency.
— Kiren Rijiju (मोदी का परिवार) (@KirenRijiju) March 27, 2024
15. Sagalee Assembly Constituency: Shri… pic.twitter.com/EMxMGgruqU
अरूणाचल प्रदेशमध्ये येत्या 19 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी बुधवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस होता. एकूण 60 जागा असणाऱ्या विधानसभेमधील पाच ठिकाणी केवळ एकच अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध निवडून आल्याचं स्पष्ट झालंय. या सर्व पाचही जागा भाजपच्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू आणि उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांचा समावेश आहे. त्याचसोबत राटू टेकी, जिक्की टाको, न्यातो दुकोम आणि मुटकू मिथी यांचा समावेश आहे.
अरूणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रित मतदान होणार असून त्याचा निकाल 2 जून रोजी लागणार आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या एकूण जागांची संख्या 60 आहे. 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 41 जागांवर विजय मिळाला होता.
अरूणाचल प्रदेश विधानसभेचे पक्षीय बलाबल -
एकूण जागा - 60
- भाजप - 41
- जनता दल युनायटेड - 7
- नॅशनल पीपल्स पार्टी - 5
- काँग्रेस - 4
- अरूणाचल प्रदेश पार्टी - 1
- अपक्ष - 2
Chief Minister of Arunachal Pradesh @PemaKhanduBJP has created history by winning and getting Elected Unopposed from the 3 - Mukto (ST) Assembly Constituency.
— MANOGYA LOIWAL मनोज्ञा लोईवाल (@manogyaloiwal) March 27, 2024
Son of Legendary Congress Leader and former CM Dorjee Khandu, Pema Khandu is spearheading The Land of Rising Sun to a… pic.twitter.com/XsOGpGYk8S
ही बातमी वाचा: