एक्स्प्लोर

Amravati Lok Sabha Result 2024 : जनतेच्या कोर्टात नवनीत राणांचा पराभव; काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी अमरावतीत विजयाचा गुलाल उधळला

Amravati Lok Sabha Result 2024 : अमरावतीमध्ये भाजप,प्रहार आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली. यामध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचा विजय झाला.

Amravati Lok Sabha Result 2024 : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha Result) मैदानात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे मैदानात होते. पण या तिहेरी लढतीत काँग्रेसने बाजी मारत बळवंत वानखेडेंनी विजयाचा गुलाल उधळलाल. त्यामुळे विदर्भातील एका महत्त्वाच्या जागेवरची महायुतीची आणि पर्यायाने भाजपची पकड सुटली. 

दरम्यान पहिल्या फेरीपासून बळवंत वानखेडे हे आघाडीवर होते. त्यातच काही फेऱ्यांनंतर ही आघाडी फिरली आणि नवनीत राणांनी कमबॅक केलं. पण तरीही बळवंत वानखेडे यांनी ती पकड कायम ठेवत बाजी मारली. दरम्यान ही तिहेरी लढत अपेक्षेप्रमाणेच रंगतदार ठरली. पण अखेर अमरावतीकरांनी काँग्रेसला कौल देत हा निकल फिरवला. 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Amravati Lok Sabha Voting Percentage 2024)

यंदा अमरावती लोकसभा मतदारसंघात  26 एप्रिल रोजी 63.67 टक्के मतदान झाले.
बडनेरा - 55.78 टक्के
अमरावती - 57.52 टक्के 
तिवसा - 64.14 टक्के 
दर्यापूर - 66.88 टक्के
मेळघाट - 71.55 टक्के
अचलपूर - 68.84 टक्के 

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

अमरावतीमध्ये काँग्रेसचे तीन आमदार तर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. त्याचप्रमाणे उमेदवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत. 

बडनेरा - रवी राणा, अपक्ष
अमरावती - सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा - यशोमती ठाकूर, काँग्रेस 
दर्यापूर - बळवंत वानखडे, काँग्रेस 
अचलपूर - बच्चू कडू, प्रहार 
मेळघाट - राजकुमार पटेल, प्रहार

2019 सालचा निवडणूक निकाल - (Amravati Lok Sabha Constituency 2019 Result)

नवनीत राणा (अपक्ष) 5,05,133 मतं
आनंदराव अडसूळ (शिवसेना) 4,68, 687 मतं

तिहेरी लढतीमुळे निवडणूक चर्चेत

अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा या 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं. त्यातच नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल देखील न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या दाट चर्चा होत्या आणि  झालंही तसंच. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून नाराजीचे सूर उमटू लागेल. त्यातच शिंदेंसोबत गेलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या मैदानात त्यांचा उमेदवार उतरवला. त्यामुळे अमरावतीची ही निवडणूक काहीश्या नाराजीच्या वातावरणाभोवती फिरल्याचं पाहायला मिळालं. 

आदिवासींचे प्रलंबित प्रश्न

अमरावतीमधील बहुतांशी भाग हा आदिवासींचा आहे. अमरावती जिल्ह्यात शिक्षणाच्या चंगल्या सुविधा असल्या, तरी मेळघाट आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत.आदिवासींना कोरडवाहू शेती शिवाय रोजगाराचा कुठलाच पर्याय नाही. घरातील करते पुरुष आणि तरुण शेतीचा हंगाम संपला की रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेतात. आदिवासींच्या बेरोजगारीचा प्रश्न देखील मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

आरोग्य सेवा ढासळलेली त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे आणि गावात जाण्यासाठी रस्ते नसल्याने खूप अडचणीचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागतो.  त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आदिवासींच्या विकासाची आश्वासनं दिली जातात पण ती अजूनही फक्त आश्वासनचं राहत असल्याचं अमरावतीकरांचं म्हणणं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget