एक्स्प्लोर

Kirtikar vs Waikar प्रकरणात नवा ट्विस्ट, रवींद्र वायकरांच्या मेहुण्याविरोधात गुन्हा; मंगेश पंडीलकरांवर अटकेची टांगती तलवार!

Amol Kirtikar vs Ravindra Waikar : अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. आता या प्रकरणातील एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय.

Amol Kirtikar vs Ravindra Waikar, Mumbai North West Loksabha :  रवींद्र वायकर आणि आमोल किर्तीकर यांची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक अटीतटीची लढत झाली. अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. सुरुवातीला अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, फेरमतमोजणीत पोस्टल मतं निर्णायक ठरल्याने रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी निसटता विजय मिळवला होता. आता या प्रकरणातील एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.आता तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आलंय. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.

FIR कॉपी देण्यास पोलिसांचा नकार

लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागला आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला. मात्र त्या दिवशी वायकर यांचा मेहुणा  मतमोजणी केंद्रात ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं. मतमोजणी केंद्रावरील खोलीत परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणात उमेदवार भरत शाह यांना साक्षीदार बनवण्यात आलं आहे. तक्रारदार उमेदवार भरत शाह यांना एफआयआर कॉपी देण्यास पोलिसांचा नकार देण्यात आला. 

निवडणूक अधिकाऱ्यांचं पोलिसांकडे बोट-

निवडणूक निर्णय अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनीसुद्धा यासंबंधी चौकशी करायला पोलिसांकडे बोट दाखवलं आहे. सुरक्षेच्या संबंधी यंत्रणा हाताळण्याचं काम पोलिसांचं आहे. त्यामुळे मतमोजणीचे काम करणाऱ्या निवडणूक अधिकारी या गोष्टीला जबाबदार नसल्याचं , मतमोजणी केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. शिवाय अमोल कीर्तीकर यांनी सुद्धा या सगळ्या प्रकारात संबंधी पोलिसांकडे  मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. तर मंगेश पंडिलकर मतमोजणी केंद्राचे मुख्य खोलीमध्ये मोबाईलचा वापर कशासाठी करत होता? त्याचं नेमकं मतमोजणी केंद्रावर काम काय होतं? असा सवाल उपस्थित केलाय.

नेमकं काय घडलं?

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा पराभव केला. याआधी अमोल किर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.  आता किर्तीकर यांच्या आक्षेपानंतर बाद करण्यात आलेल्या 111 पोस्टल मतांची फेरमतमोजणी करण्यात आली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी 26 फेऱ्या आणि बाद करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आल्यानंतर रविंद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली. अमोल किर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वायव्य मुंबईत अमोल किर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget