Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचा स्वबळावर स्वतंत्र लढण्याचा पवित्रा? अंबादास दानवे म्हणाले....
येणाऱ्या निवडणुका मविआत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा ठाकरे गटाच्या काही पराभूत उमेदवारांचा सूर आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया देत या मुद्यावर भाष्य केलंय.

Ambadas Danve मुंबई : येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा ठाकरे गटाच्या काही पराभूत उमेदवारांचा सूर आहे. उद्धव ठाकरे यांनी काल बोललेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत ईव्हीएम गोंधळाच्या मुद्द्यासोबत काही पराभूत उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडला. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवून फारसा फायदा विधानसभा निवडणुकीत झाला नसल्याचे काही पराभूत उमेदवारांचं म्हणणं उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांनी मांडलं. मात्र यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. पक्षप्रमुख आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपली प्रतिक्रिया देत या मुद्यावर भाष्य केलंय.
कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याच्या भावना- अंबादास दानवे
काही लोकांचा सुर आहे की आपण स्वतंत्र लढल पाहिजे. एक दोन नाही तर अनेकांनी मत व्यक्त केल कि शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे. शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. मात्र कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी कोणाचीही गरज नाही एवढं त्यांच्या एका पक्षाला यश मिळाला आहे थोड्या बहुत उरलेल्या लोकांची ते तजवीज करू शकतात. तर महायुतीत . महायुतीत शिंदे कितीही नाराज असले तरी त्यांना भाजप समोर झुकावं लागेल. भाजप उठ म्हटले तर उठाव लागेल बस म्हटले तर बसावं लागेल. त्यांच्यावर अन्याय होत नाही आहे. भाजपने अनेक गोष्टी एकनाथ शिंदे यांना दिल्या आहे. महाराष्ट्र लुटायला दिला. चोरलेलं चिन्ह दिले. सत्ता दिली. त्यामुळे आता भाजप मुख्यमंत्री पदाची भुमिका योग्य आहे. अशी प्रतिक्रिया देत अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
ईव्हीएमबाबत कुठं तरी पाणी मुरतय, बॅलेटवर मतदान व्हावं- अंबादास दानवे
आमच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. जिंकलेल्या उमेदवारांच्या पण काही तक्रारी होत्या. अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मतांमध्ये देखील अनेक तफावत आढळून आली आहे. सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कुठेतरी पाणी मुरतय, हे स्पष्ट होतय. ईव्हीएम मध्ये पाणी मुरतय. बॅलेटवर मतदान व्हावं, अशी आता जनभावना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जनआंदोलन देशपातळीवर झालं पाहिजे. निवडणूक आयोगाने कन्नडमध्ये जे केलं ते राज्यात अनेक ठिकाणी झालंय, या प्रकारांवर पारदर्शक पणे उत्तर द्यावे लागती, असेही अंबादास दानवे म्हणाले.
एवढं बहुमत मिळालं तर तासभर ही लागायला पाहिजे नव्हता. डिक्लेर का होत नाही? काही नेतृत्वाविषयी शंका आहे का? मुख्यमंत्री पद दुस-याला द्यायची गरज काय? त्यांचे 133 आमदार आहे त्यांना 145 आमदार जमा करण हे फार अवघड नाही. काही ठिकाणी मत पेट्या उघड्या आल्या त्याबद्दल निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे. असेही अंबादास दानवे म्हणाले.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
