एक्स्प्लोर
राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही : अजित पवार
राज हे बाळासाहेब यांचे पुतणे असून त्याना कशाला स्क्रिप्ट लिहून द्यावी लागतेय असे म्हणत अजित पवार यांनी त्या मुख्यमंत्र्यांना याना टोला लगावला.
![राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही : अजित पवार Ajit Pawar support Raj Thackeray on Speech Script राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही : अजित पवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/09041614/raj-ajit.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती : भाजपकडून राज ठाकरेंवर टीका होत असताना आता अजित पवारच राज ठाकरेंच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भाजपकडून भाषण करत होते त्यावेळेस भाजपाच्या नेत्यांना आतुन उकळ्या फुटत होत्या. बरं वाटत होतं. पण आता त्यांच्या विरोधात राज ठाकरे भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले. त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला लागले असल्याचे अजित पवार म्हणाले.
VIDEO | राज ठाकरेंच्या भाषणाचा विनोद तावडेंकडून समाचार | मुंबई | एबीपी माझा
राज ठाकरे जे काही सांगतात ते स्क्रीनवर दाखवून सांगतात. राज हे बाळासाहेब यांचे पुतणे असून त्याना कशाला स्क्रिप्ट लिहून द्यावी लागतेय असे म्हणत अजित पवार यांनी त्या मुख्यमंत्र्यांना याना टोला लगावला. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या नारळाच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार कन्हेरी या गावी बोलत होते.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. गल्लीतील लोक कलाकार आहेत, त्यांना लिहून दिलेल्या स्क्रिप्टवर ते अभिनय करतात. राज ठाकरेंचं भाषण सुद्धा तसंच असतं. ते सुपारी घेऊन भाषण करतात, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला, तर "शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे" अशा शब्दात शेलार यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे.
VIDEO | मनसे नाही तर उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना- देवेंद्र फडणवीस | एबीपी माझा
संबंधित बातम्या
राज ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतात, विचलीत होऊ नका, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
राज ठाकरेंच्या भाषणातला 'पोपट' पाकिस्तानचा तर नाही ना? विनोद तावडेंचा सवाल
मोदी-शाहांविरोधात सभा घेणार, राज ठाकरेंची घोषणा, फडणवीसांचाही समाचार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)