सगे सोयरेबाबत लक्ष घालून मार्ग काढू, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झालीय : अजित पवार
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नवी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.
![सगे सोयरेबाबत लक्ष घालून मार्ग काढू, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झालीय : अजित पवार Ajit Pawar said he discuss with Eknath Shinde and Devendra fadnavis on sage soyare demand marathi news सगे सोयरेबाबत लक्ष घालून मार्ग काढू, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झालीय : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/351379957407d910e5f6d45b7f4da5d31717938947971989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं (Nationalist Congress Party) कॅबिनेट मंत्रिपदासाठी वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं. याशिवाय पुण्यातील पाऊस, मराठा आरक्षण, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार यसह इतर मुद्यांवर भाष्य केलं.
सगेसोयरेच्या मुद्यावर अजित पवार काय म्हणाले?
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आमची एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने सगे सोयरे बाबत निर्णय घेण्याबाबत काय, कुणी बोलायचं हे आमचं ठरलं आहे. आम्ही लक्ष घालून मार्ग काढू, असं अजित पवार यांनी म्हटलं.
देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेत आहेत. या सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. आज आम्ही शपथविधीसाठी आलो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मीटिंग झाली. काल रात्री आमच्या सोबत संपर्क करण्यात आला. रात्री जे.पी. नड्डा, अमित शाह यांच्यासमवेत आमची चर्चा झाली. त्यावेळीं मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला देखील मंत्रिपद मिळावं. आता लवकरच आमची संसदेत 4 संख्या होणार आहे. आम्हाला 1 जागा मिळावी यासाठी विनंती केली, असल्याचं अजित पवार म्हणाले.
काल त्यांचा आम्हाला मॅसेज आला की शिंदेंना जसा स्वतंत्र पदभार असणारे खाते दिले आहे. तसं तुम्हाला देखील देऊ परंतू आम्हाला तसं नको होतं. आम्ही कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती. लवकरच ती देखील पूर्ण केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत कशाचा फटका बसला?
अल्पसंख्याक समाजात एक भीती निर्माण झाली होती, त्याचा फटका महायुतीला बसला. संविधान मुद्दा देखील महत्त्वाचा होता ज्यामुळे लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे. ती कमी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. मराठा आरक्षण फटका देखील बसला. कापूस दूध सोयाबीन कांदा याचा देखील फटका बसला, असं अजित पवार म्हणाले. ज्यावेळी अपयश येतं त्यावेळी वेगवेगळे सल्ले दिले जातात. आम्ही त्यावर प्रतिक्रिया दिली की चुकीचे अर्थ निघतात, असं अजित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, पुण्यातील पावसाच्या अनुषंगाने पुणे आयुक्त, पीसीएमसी आयुक्त यांच्याशी सातत्यानं बोलत आहे. पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सरकार म्हणून प्रत्येक खबरदारी घेतली जात आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. आमच्या पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धीरज शर्मा यांची निवड करण्यात आली आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)