एक्स्प्लोर

NCP : जयंत पाटील, रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार, महायुतीत जागा अजित पवारांकडे जाणार

NCP : महायुतीच्या जागा वाटपात सागंली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ आणि इस्लामपूर हे दोन मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहेत.

सांगली :  महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होऊन दोन दिवस झालेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. जागावाटपाच्या चर्चेसाठी महायुतीचे प्रमुख नेते आज पुन्हा दिल्लीला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सांगली जिल्ह्यात जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार 2019 च्या विधानसभेवेळी निवडून आले होते त्या जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार 2019 ला सांगली जिल्ह्यातून विजयी झाले होते. त्यापैकी तासगाव कवठेमहांकाळ आणि इस्लामपूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. 

सांगलीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेल्यावेळी  इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठेमहांकाळमधून सुमनताई पाटील आणि शिराळा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक आमदार झाले होते. यापैकी इस्लामपूर आणि तासगाव कवठेमहांकाळची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. 

जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्या विरोधात कोण लढणार?

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  24 सप्टेंबरला जयंत पाटील अर्ज दाखल करणार आहेत. या ठिकाणी अजित पवार कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर,  तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून यावेळी सुमनताई पाटील यांच्या ऐवजी रोहित पाटील निवडणूक लढवणार आहेत. शिराळ्यातून मानसिंगराव नाईक पुन्हा निवडणूक लढवतील.  त्यामुळं या मतदारसंघात अजित पवार कुणाला उमेदवारी देतात यावर पुढील चित्र स्पष्ट होईल. 

माजी खासदार संजयकाका पाटील यांची लेकासाठी मोर्चेबांधणी 

तासगावात संजयकाका पाटील आणि सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यामध्ये संघर्ष राहिलेला आहे. संजयकाका पाटील हे दोन टर्म भाजपचे खासदार राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तासगावमधून रोहित पाटील निवडणूक लढवणार आहेत. या ठिकाणी संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील इच्छुक आहेत. जागा वाटपात हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्यास प्रभाकर पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी संजयकाका पाटील प्रयत्नशील आहेत.  संजयकाका पाटील मुंबईत आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

अजित पवार यांना जागा सुटण्यामागचं कारण काय?

तासगाव कवठेमहांकाळ आणि इस्लामपूर या ठिकाणी गेल्या अनेक टर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ असल्यानं इथं राष्ट्रवादीचा उमेदवार असल्यास फायदा होऊ शकतो, असा अंदाज महायुतीच्या नेत्यांचा आहे. 

इतर बातम्या : 

अर्ध्या वाटेत शिंदेंना सोडलं, गुजरातहून परतणाऱ्या कैलास पाटलांना ठाकरेंकडून गिफ्ट, थेट धाराशीवची उमेदवारी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : मविआतल्या घडामोडींचे राऊतांकडून अपडेटMVA Allegation : बोगस पद्धतीने मतदार यादीतून नावं वगळली जात असल्याचा मविआचा आरोपRajan Teli:  कोण आहेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे राजन तेली ?1 Min 1 Constituency : चर्चेचे झोंबरे वारे; मतभेदाचे निखारे ? : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Nawaz Sharif on India : जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
Child Marriage Act : जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget