एक्स्प्लोर

Ajit Pawar: भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...

Ajit Pawar in Mumbai: अजित पवारांनी सरकारची कुठलीही योजना बंद पडणार नाही आणि विकासाला निधी कमी पडणार नाही असे नियोजन असल्याचे सांगितले.

मुंबई: दाऊदच्या हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका असणारे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचा विरोध असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिला होता. यानंतर भाजपच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर एबीपीच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांचा भक्कमपणे बचाव केला.

 नवाब मलिकांना असणाऱ्या भाजपच्या विरोधाबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी म्हटले की, शेवटी प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असतो. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर कोणतेही प्रश्न उपस्थित होणार नाही, एवढं मी सांगतो. नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांवर वेगवेगळे आरोप झाले आहेत, माझ्यावरही आरोप झाले आहेत. कधीकधी एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला बदनाम करण्यासाठी प्रयत्न होता. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले, त्यांना प्रचंड बहुमत मिळाले, तेव्हादेखील असे प्रयत्न झाले. काही व्यक्तींच्याबाबत त्यांची इमेज डॅमेज केल्याशिवाय पुढे जाता येत नाही, असा प्रकार असतो. 

एखादा नरेटिव्ह सेट करताना तेच तेच बोलून, त्याला बदनाम केले जाते. सातत्याने अशी गोबेल्स निती वापरली की लोकांचही मतपरिवर्तन होते. अनेक लोकांवर आरोप होतात. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर केवळ आरोप होणे ही वेगळी गोष्ट आहे आणि ते आरोप सिद्ध होऊन शिक्षा होणे, ही वेगळी गोष्ट आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, हे आमचे मत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

नवाब मलिकांनी शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज

नवाब मलिक यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवाजीनगर-मानखुर्द  विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. नवाब मलिक घरातून उमेदवारी अर्ज भरायला निघाले तेव्हा त्यांच्याकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नव्हता. मात्र, मलिकांनी वेळ पडल्यास अपक्ष लढायचे, असा चंग बांधला होता. अखेर शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना अजितदादा गटाकडून एबी फॉर्म पाठवण्यात आला आणि त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी याप्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता नवाब मलिक यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज मागे न घेतल्यास देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

काका पुतण्या एकत्र येणार का ? दादा म्हणाले मी ज्योतिष नाही, राजकारणात काहीही होऊ शकतं

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Politics : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच भाजपमध्ये गटबाजी? नागपूर पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्याचं स्फोटक विश्लेषण; पराभवामागचं राज'कारण' सांगितलं
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Embed widget