ABP C-Voter Survey : पंजाबमध्ये जनतेचा कौल कुणाल? चरणजीत सिंह चन्नी की, सिद्धू? सर्व्हेमध्ये खुलासा
Punjab Assembly Elections 2022 : काँग्रेसनं कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्याऐवजी चरणजीत चन्नी (Charanjit Channi) यांना पंजाबची धुरा सोपावली आहे. परंतु, पक्षात अद्यापही अंतर्गत धुसपूस सुरुच आहे.
Punjab Assembly Elections 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीची घोडदौड सुरु झाली आहे. आणखी एका ठिकाणी पक्षाकडून असं सांगण्यात आलं आहे की, काँग्रेस पक्ष पंजाबमध्ये चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल, परंतु निवडणुकीनंतर पक्ष मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं याचा निर्णय घेईल. दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू सातत्यानं सांगत आहेत की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी पक्षावर दबाव आणत आहेत.
या सर्व घडामोडींमुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की, पंजाबमध्ये येणाऱ्या निवडणुकींमध्ये काँग्रेसनं कोणता चेहरा पुढे करुन निवडणूक लढवली पाहिजे? ABP News ने C-Voter सोबत पंजाबच्या जनतेसमोर हा प्रश्न उपस्थित केला. सर्व्हेमध्ये लोकांना जेव्हा विचारण्यात आलं की, पंजाबमध्ये काँग्रेसला कोणत्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली पाहिजे? त्यावेळी 42 टक्के लोकांनी म्हटलंय की, काँग्रेसनं मुख्यमंत्री चन्नी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं पाहिजे.
दुसरीकडे, 23 टक्के लोकांनी नवज्योतसिंह सिद्धू यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवण्यास सहमती दर्शवली. मात्र, या दोघांच्या चेहऱ्यावर काँग्रेसने निवडणूक लढवू नये, असं केवळ 23 टक्के लोकांनी सांगितलं. तर 12 टक्के लोकांनी आपल्याला माहीत नसल्याचं सांगितलं.
पंजाबमध्ये निवडणुकीत काँग्रेसचा चेहरा कोण?
'सी वोटर'चा सर्व्हे
चरणजीत सिंह चन्नी : 42%
नवजोत सिंह सिद्धू : 23%
दोन्ही नाही : 23%
माहीत नाही : 12%
पंजाब (Punjab) मध्ये यंदा ओपिनियन पोल (Opinion Poll) मध्ये आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसणार आहे. ओपिनियन पोलमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि भाजप यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर निवडणुकीला खरा रंग चढणार आहे. त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं रंगणार आहे. पंजाबमधील शेतकरी संघटनांनीही विधानसभा निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. अशातच निवडणुकांच्या निकालापूर्वी काहीच अंदाज बांधणं कठिण आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ABP C Voter Survey : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नेत्यांनी दौरे रद्द करावेत? जनतेचं म्हणणं काय?
- ABP News C Voter Survey : मोदींचा वाराणसी दौरा उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपसाठी फायदेशीर? काय म्हणतो सर्व्हे?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह