एक्स्प्लोर

UP Election : गोरखपूर भाजपचा अभेद्य गड, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

यूपीमध्ये 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये गोरखपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत.

UP Election 2022 : विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीच्या प्रसाचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये गोरखपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. गोपखपूर हा भाजपचा अभेद्य गड मानला जातो. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात या मतदारसंघातून 12 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1998 ते 2017 पर्यंत गोरखपूर मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपचे उमेदवार म्हणून येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते अगदी कमी फरकाने विजयी झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाचे अंतर वाढत गेले. 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले.

मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात 12 उमेदवार

गोरखपूर जिल्ह्यातील सर्व 9 विधानसभा जागांसाठी एकूण 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गोरखपूरच्या जागेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात एकूण 12 उमेदवार आहेत. हे 12 उमेदवार बहुतांशी राजकारणातील नवे खेळाडू आहेत. समाजवादी पार्टीने गोरखपूरमधून  भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभवती शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. तर बहुजन समाज पक्षाकडून (बसपा) ख्वाजा शमसुद्दीन आणि काँग्रेसकडून चेतना पांडे रिंगणात आहेत. त्याचवेळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण आझाद समाज पक्षाशी (कांशीराम) खेळत आहे

राजकीय तज्ञांच्या मतानुसार, गेल्या 33 वर्षांपासून गोरखपूर मतदारसंघाची समीकरणे ही,  गोरखनाथ मंदिराने ठरवली आहेत. या 33 वर्षांत एकूण आठ निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजप आणि हिंदू महासभा (योगी आदित्यनाथ यांच्या पाठिंब्याने) सात वेळा विजयी झाल्या आहेत. 2002 मध्ये डॉ. राधामोहन दास अग्रवाल अखिल भारतीय हिंदू महासभेच्या बॅनरखाली या जागेवरून विजयी झाले होते. परंतू, विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजतागायत त्यांनी या जागेवर कब्जा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Embed widget