एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल
डॉक्टर जलील परकार यांच्या देखरेखीखाली राऊत यांच्यावर पुढील दोन दिवस उपचार होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. राऊत यांच्या एन्जिओग्राफी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लिलावतीमधील ज्येष्ठ हृदयतज्ज्ञांच्या देखरेखीखाली राऊत यांच्यावर पुढील दोन दिवस उपचार होणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यासाठी लिलावती रुग्णालयाच्या अकराव्या मजला रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. दरम्यान काळजी करण्यासारखं कारण नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच संजय राऊत शिवसेनेच्या बाणाची आणि ढालीची भूमिका बजावत आहेत. निकालानंतर सगळेच दिवस संजय राऊत पत्रकार परिषद असो विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी असो किंवा सामनातील अग्रलेख असो संजय राऊत हा एकमेव चेहरा शिवसेनेची बाजू लढताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसातील ताणामुळे त्यांच्या छातीत दुखत होतं. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र कुटुंबाच्या आग्रहाखातर संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात अपॉईंटमेंट घेऊन अॅडमिट केलं.
डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीखाली संजय राऊत यांच्यावर लिलावतीत उपचार सुरु आहेत. अजित मेमन हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी याआधी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही उपचार केले होते. तसेच 2012 साली उद्धव ठाकरे यांच्यावरही उपचार केले होते.
दरम्यान, संजय राऊत यांच्या अनुपस्थितीत एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर या तीन नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी गेल्या 15 दिवसांपासून शिवसेनेची बाजू लढवली आहे. शिवाय भेटीगाठींमध्येही तेच अग्रेसर होते. त्यामुळे आता त्यांची जबाबदारी आता या तीन नेत्यांवर पडली आहे.
"संजय राऊत यांची प्रकृती उत्तम आहे. ते रुटिन चेकअपसाठी लिलावतीमध्ये दाखल झाले आहेत. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल," असा विश्वास शिवसेनाचे आमदार आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत यांनी 'एबीपी माझा'कडे व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement