एक्स्प्लोर

Maharashtra Government Formation | उद्धव ठाकरेंची शरद पवार यांना पाठिंब्यासाठी विनंती

भाजप सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. या बैठकीत शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव दिल्याचं कळतं. वांद्र्यातील 'ताज लॅण्ड्स एण्ड'मध्ये या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. बैठकीत शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेही 'मातोश्री'वरुन 'ताज लॅण्ड्स एण्ड'मध्ये पोहोचले. शेतकऱ्यांचा अजेंडा घेऊन काम करणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत झाल्याचं कळतं. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. आता खुद्द उद्धव ठाकरेच शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी या दोन्ही नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. कदाचित इथून राज्यातील नव्या सत्तासमीकरणाला सुरुवात होईल. भाजप सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा, बातचीत, बैठकीच्या फैऱ्या सुरु आहेत. त्याचा पुढचा भाग म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज भेट झाली आहे. पाठिंब्यासाठी आम्हाला अद्याप कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही, असं शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे दुपारी 4.30 नंतरच स्पष्ट होईल. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर 4.30 वाजता काँग्रेस आपला निर्णय जाहीर करेल. तेव्हाच राष्ट्रवादीही भूमिका स्पष्ट करणार आहे. संबंधित बातम्या Maharashtra Government Formation | युतीबद्दल संध्याकाळी 4.30 नंतर भूमिका जाहीर करु : सुधीर मुनगंटीवार शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, अरविंद सावंत राजीनामा देणार शिवसेना-भाजप युतीची घोषणा; मात्र जागावाटप अजूनही गुलदस्त्यात, कारण... Maharashtra Government Formation | ...असा असेल भाजपचा "गेम ऑफ पेशन्स!

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
India Alliance on SIR Meeting: इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
इंडिया आघाडीची SIR वर उद्या बैठक, ज्ञानेश कुमार हटाव मोहिमेला आणखी जोर येणार! पण अखिलेश यादव का येणार नाहीत, उद्धव ठाकरेंचं काय ठरलं?
Embed widget