एक्स्प्लोर

Maharashtra Government Formation | शिवसेनेला पाठिंब्याच्या पत्रावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ब्लेमगेम

तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही शिवसेनेप्रमाणे 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे.

मुंबई : शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र उशीर झाल्याच्या मुद्यावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपली आहे. शरद पवारांमुळे पत्र द्यायला उशीर झाला, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला होता. याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये असल्याने चर्चेत अडचणी आल्या. तसंच काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र त्यांना मिळू शकलं नाही. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत पुरेसं संख्याबळ नसल्याने शिवसेना सोमवारी (11 नोव्हेंबर) सत्ता स्थापन करु शकली नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही शिवसेनेप्रमाणे 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे. पवारांच्या म्हणण्यावरुन चर्चा एक दिवस पुढे : माणिकराव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळूनच बहुमत होत आहे. शिवसेनेने पक्षनेतृत्त्वाशी फोनवरुन बोलणी केल्यानंतरच चर्चेची बोलणी झाली. मग राज्यातील काँग्रेस नेत्यांना चर्चेसाठी बोलावणं आलं. त्यांच्या मतमतांतर होती. परंतु निर्णय झाल्यानंतर सोनियां गांधींनी शरद पवारांशी चर्चा केली. मात्र आपण चर्चा करुन घेऊ, त्यानंतर पुढची पावलं टाकता येतील, असं पवारांनी सांगितलं. त्याच्या म्हणण्यावरुनच चर्चा एक दिवस पुढे गेली. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळच कमी मिळाला. त्यांना दोन्ही पक्षांसोबत चर्चा करायची, असं पवार साहेबांचं म्हणणं होतं. त्यामुळे 24 तासात सत्ता स्थापनेचा दावा शक्य झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना संपर्कात आहेत. गरज पडल्यास शिवसेनेसोबत चर्चा करता येईल, असं माणिकराव ठाकरे म्हणाले. आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो : अजित पवार संपूर्ण दिवस आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. आम्ही एकट्याने पत्र देऊन काही उपयोग नव्हता. काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. इथे सगळे असते, तर निर्णय घ्यायला सोपं झालं असतं. काँग्रेस सोबत आली तरच मार्ग निघू शकतो, असं म्हणत अजित पवार यांनी माणिकराव ठाकरेंच्या दाव्याला उत्तर दिलं आहे. संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget