(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UPSC CSE Result 2022: नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 निकालासंदर्भात UPSC ची महत्त्वाची सूचना जारी, जाणून घ्या
UPSC CSE Result 2022: UPSC ने नागरी सेवा मुख्य परीक्षा निकालाशी संबंधित महत्त्वाची सूचना जारी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
UPSC CSE Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा (UPSC Civil Services Main Result 2022) चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आयोगाने UPSC नागरी सेवा मुख्य निकाल 2022 ची आवश्यक सूचना जारी केली आहे. मुख्य परीक्षेत बसलेले उमेदवार आयोगाच्या (UPSC) अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आवश्यक सूचना तपासू शकतात.
UPSC कडून अधिकृत नोटीस जारी
UPSC ने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, 'नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2022 (CSM2022) च्या उमेदवारांना कळविण्यात येते की, या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.' नोटीसमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना पुढील टप्प्याची माहिती देण्यात आली आहे. आयोगाने म्हटले आहे की, लेखी परीक्षेच्या घोषणेनंतर लगेच, यशस्वी उमेदवारांना तपशीलवार अर्ज-II (UPSC DAF-II) वेळेत भरावा लागेल. जे उमेदवार व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखत फेरीत पात्र ठरतील, त्यांना DAF-II भरावे लागेल.
आयोगाचे उमेदवारांना स्पष्ट निर्देश
आयोगाने उमेदवारांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2022 (CSM2022) च्या उमेदवारांना कळविण्यात येते की या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, तपशीलवार अर्ज II म्हणजेच DAF II आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. हा अर्ज काही काळ आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखत परीक्षा उत्तीर्ण होणार्या उमेदवारांना त्यांचा DAF II कालमर्यादेत भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.
एकूण 1011 पदांची भरती
UPSC ने दिलेल्या माहितीनुसार, UPSC CSE च्या या भरती मोहिमेद्वारे एकूण 1011 पदांची भरती केली जाईल. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची पूर्व परीक्षा 05 जून रोजी घेण्यात आली होती आणि 22 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. परीक्षेशी संबंधित कोणतेही तपशील जाणून घेण्यासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या. येथे तुम्हाला सर्व तपशील मिळतील.
UPSC नागरी सेवा मुलाखत कधी आहे?
जारी केलेल्या सूचनेनुसार, आयोग पुढील वर्षी मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी घेईल. मुख्य निकाल तसेच मुलाखतीच्या तारखा जारी केल्या जाऊ शकतात. व्यक्तिमत्व चाचणी किंवा मुलाखतीच्या उद्देशाने उमेदवारांना त्यांच्या मूळ कागदपत्रांसह प्रत्येकाची एक झेरॉक्स छायाप्रत सोबत ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. कागदपत्रांमध्ये इयत्ता 10वी, इयत्ता 12वीची गुणपत्रिका, पदवी परीक्षेची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, PwBD प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. अधिक तपशीलांसाठी UPSC सूचना काळजीपूर्वक वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI