Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
सेंट झेवियर्स कॉलेज मुंबई, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि नागपूर महानगरपालिकामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सर्व माहिती खालीलप्रमाणे,
नागपूर महानगरपालिका
पोस्ट - फायरमन
शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोर्स उत्तीर्ण, MS-CIT
एकूण जागा - 100
वयोमर्यादा - 18 ते 30वर्ष
नोकरीचं ठिकाण - नागपूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 मार्च 2022
तपशील - www.nmcnagpur.gov.in
सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई
पोस्ट - शिक्षक
शैक्षणिक पात्रता - M.Com./M.A., B.Ed. for Commerce/Arts and MCA for IT
एकूण जागा - 10
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सेंट झेवियर्स कॉलेज, 5 महापालिका मार्ग, मुंबई, महाराष्ट्र ४०० ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 मार्च 2022
तपशील - xaviers.edu (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. Junior College (Commerce Stream) Faculty Position Vacancies यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक
विविध पदांच्या ८ जागांसाठी भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट - ट्रेजरी डोमेस्टिक डिलर (ऑफिसर ग्रेड II)
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडून पदवी/ पदव्युत्तर पदवी सह वित्त/ सांख्यिकी /गणित विषयातील स्पेशलायजेशन, २ ते ५ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 4
वयोमर्यादा - 23 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022
तपशील - www.mscbank.com
दुसरी पोस्ट - ट्रेजरी फॉरेक्स डिलर (ऑफिसर ग्रेड II)
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडून पदवी/ पदव्युत्तर पदवी सह वित्त/ सांख्यिकी /गणित विषयातील स्पेशलायजेशन, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 1
वयोमर्यादा - 23 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022
तपशील - www.mscbank.com
तिसरी पोस्ट - ट्रेजरी मिड ऑफिस/ बॅक ऑफिस (ज्युनियर ऑफिसर)
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डकडून पदवी/ पदव्युत्तर पदवी, अनुभव महत्वाचा आहे.
एकूण जागा - 3
वयोमर्यादा - 23 ते 35 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022
तपशील - www.mscbank.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. RECRUITMENT OF TREASURY SPECIALIZED OFFICERS IN THE MAHARASHTRA STATE COOPERATIVE BANK LTD., MUMBAI या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, अर्जासाठी उरले दोन दिवस
- Job Majha: बँक ऑफ बडोदा आणि SIDBI मध्ये मोठी भरती सुरू; असा करा अर्ज
- नौदलात 1531 पदांसाठी बंपर भरती, प्रतिमाह 60 हजारांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी, कसा कराल अर्ज?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI