Ulhasnagar: उल्हासनगरात धुळवडीच्या दिवशी हत्या (Murder) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्युची नोंद केली होती. मात्र, तापसानंतर हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. धुळवडीच्या दिवशी रस्त्यातून घरी जाणाऱ्या एका वाटसरूची दोघांनी भरदुपारी ही हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत मुख्य आरोपीला अटक केली आहे.


कुंदनमल सुनगत हा 41 वर्षीय व्यक्ती धुळवडीच्या दिवशी दुपारच्या सुमारास धोबीघाट परिसरातून घरी निघाला होता. याचवेळेस रूपराज पाटील आणि निशांत साठे या दोघांनी कुंदनमलला वाटेत अडवून सिमेंटच्या ब्लॉकनं त्याच्या डोक्यात प्रहार केला. ज्यात कुंदनमल हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 


दरम्यान या संदर्भाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सुरुवातीला कुंदनमलच्या भावानं लोखंडी पाईपवरून पडून भावाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितलं. त्यामुळं त्याच्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदनाच्या अहवालात कुंदनमलच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं उघड झाले. 


याशिवाय पोलिसांना काही गोपनीय माहितीद्वारे हा अकस्मात मृत्यू नसून हत्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघी धोबीघाट परिसरातील काही गोपनीय साक्षीदारांच्या मदतीनं पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत याप्रकरणी रूपराज पाटील या रेकॉर्ड वरच्या गुन्हेगाराला अटक केली आहे. तर त्याचा दुसरा साथीदार निशान साठे हा फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. 


हे देखील वाचा-


सोलापुरात उसतोड कामगारांकडूनच हत्या आणि दरोडा, 6 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश


संतापजनक...! पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना; नराधम पित्यासह भाऊ, आजोबा, मामाकडून 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार


Hijab Row : हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना वाय दर्जाची सुरक्षा, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha