Govinddevgiri Maharaj: '...म्हणून 100 टक्के मतदान करणं गरजेचं', गोविंद देवगिरी महाराजांनी सांगितलं कारण, नेमकं काय म्हणाले?
Govinddevgiri Maharaj: देश समर्थ झाला पाहिजे, यासाठी लोकांनी आपली भूमिका बजावली पाहिजे, असं गोविंददेवगिरी महाराजांनी म्हटलं आहे.
पुणे: राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गोविंददेवगिरी महाराज यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं येणं आमचा स्वभाव नाही,प ण यावेळी असं करावं असं वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज याची कथा धार्मीक व्यासपीठावरून सुरू आहे, महाराजांच्या जीवनाचे विचार सगळीकडे आहे. देश समर्थ झाला पाहिजे, यासाठी लोकांनी आपली भूमिका बजावली पाहिजे, असं गोविंददेवगिरी महाराजांनी (Govind Devagiri Maharaj) म्हटलं आहे.
तर, हिंदू मतदान गेले काही दिवस कमी झालं आहे,100 टक्के हिंदू मतदान केलं पाहिजे, विशिष्ट समाज मतदान चांगला टक्के करतो, बाहेरच्या देशातून लोक मतदान करायला येतात, यात हिंदू कमी पडत आहे, त्यांना जागरूक करण्यासाठी आलो आहे. मुस्लिम समाज मागण्या करतो, काही पक्ष मान्य करतात, मी मुस्लिम विरोधी नाही, माझ्या गावात आम्ही एकोप्याने राहतो, सगळे मुस्लिम असे नाहीत. पण, काहीजण यात नविन आले आहे. त्यामुळे ते व्यत्यय आणतात, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
बांगलादेशमध्ये काय झालं, सरकार गेलं मोठ्या संख्येने गर्दी करून त्या ठिकाणी तोडफोड करू शकतात, हिंसा घडवून आणली. आपल्या देशाच्या दारावर संकट येऊन उभा राहिला आहे. एकूण मत टक्केवारी कमी झाली आहे, यात हिंदू मतदान कमी झाले आहे हे खर आहे. 100 टक्के मतदान किंवा विक्रमी मतदान करा असा नारा घेऊन आम्ही जात आहोत, असं म्हणत गोविंददेवगिरी महाराजांनी (Govind Devagiri Maharaj) मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बंटेंगे तो कटेंगे याचा सरळ अर्थ त्याच्या पक्षाला मतदान करा, हिंदू मत कमी झाले तर तुमचा पराभव होईल. आम्ही राष्ट्राची बात करत आहोत, धर्माची बात करत नाही. मुस्लिम धर्मगुरू फतवा काढून एका विशिष्ट पक्षाला आणि आघाडीला मतदान करा असं सांगत आहेत, असं करणं योग्य नाही, मग आम्हालाही एकत्रित येऊन काम करावं लागलं आहे. अन्याय होत असेल तर कोर्टात न जाता त्याच्या कोर्टात जातात. जिथं हिदू संपत्ती धोका आहे, हिंदू विरोधी वातावरण निर्माण करत असेल तर मी कोणाच्या मागे जावा असं म्हणणार नाही, पण शिवाजी महाराज यांच्या जीवनमूल्यानुसार जे वागत असतील त्यांच्या मागे जावे असं आवहान करत आहे, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.
हिंदुत्ववादी सरकार आहे, म्हणून समाज आणि देश सुरक्षित आहे. माविआ सत्तेत येईल का नाही माहिती नाही ते येणारच नाही, जरी आले तरी मंदिर, जागा प्रश्न आला तर आम्ही एकत्रित येऊन धार्मीक पद्धतीने विरोध करू. कोणाचं सरकार येईल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, हिंदूंच रक्षण केलं पाहिजे, हिंदूसाठी काम केलं पाहिजे. ते जिहाद करणार म्हणून आपण शांत राहणार का, मला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपार आदर आहे, बाबरी बद्दल आपली भूमिका मांडणारे बाळासाहेब कुठे, जय श्रीराम म्हणणारे बाळासाहेब कुठे..अन् शिरकुरमा खाणारे, जय श्रीराम म्हंटल्यावर मुंडक छाटू म्हणणारे आणि औरंगजेबाला भाऊ म्हणणारे कुठे असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI