एक्स्प्लोर

Maha TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, वेळापत्रक अन् संपूर्ण माहिती, जाणून घ्या

Maha TET Exam 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे.

पुणे  : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यात पहिली ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी डी.एड. आणि बी.एड पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. 2024 या वर्षातील टीईटी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करणं आवश्यक आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास 9 सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे. तर, अर्ज दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे.

महाटीईटी परीक्षेसाठी अर्ज कोण करु शकतं?

महाराष्ट्रातील डी.एड आणि बी.एड पदवी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करु शकतात. महाटीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पहिली ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठीच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास हे विद्यार्थी पात्र ठरतील. शैक्षणिक पात्रतेच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक 1 साठी आणि पेपर क्रमांक 2 साठी अर्ज दाखल करता येतील.  दोन्ही पेपरना अर्ज दाखल देखील करता येतात, दोन्ही पेपर द्यायचे की केवळ एक पेपर द्यायचा हे उमेदवारावर अवलंबून असतं.   

शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार महाटीईटी परीक्षा इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व परीक्षा मंडळांच्या, सर्व माध्यमं त्यामध्ये अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना  परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 

परीक्षेचं आयोजन कधी होणार?

महाटीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित केली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षेचं प्रवेशपत्र 28 ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहेत. तर, परीक्षा 10 नोव्हेंबरला होईल.शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 सकाळी 10.30 ते 1.00 वाजेपर्यंत होईल. तर, दुसरा पेपर, त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सुरु होईल. तो साडे चार वाजेपर्यंत असेल.  

परीक्षा शुल्क किती?

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेनं महाटीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी शुल्क 700 रुपये निश्चित केलं आहे. तर, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस,  विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, दोन्ही पेपर साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी शुल्क 900 रुपये निश्चित केलं आहे. तर, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस,  विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. 

इतर बातम्या : 

मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात

10 वी पास तरुणाला थेट पर्मनंट सरकारी नोकरी, पगारही भरगच्च, कशी आहे ITBP कॉन्सेटबल पदाची निवडप्रक्रिया?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget