एक्स्प्लोर

Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा पेपर फुटी संदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयात जाण्याच्या तयारीत!

Talathi Bharti Exam तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकारावर चौकशी समिती नेमावी, यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मधील परीक्षा देणारे उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्यात याचिका दाखल करणार आहेत. 

मुंबई : राज्यातील तलाठी भरती (Maharashtra Talathi Recruitment 2023) परीक्षेत उघडकीस येत असलेला गैरप्रकार पाहता या सगळ्या संदर्भात तातडीने चौकशी समिती (Inquiry Committee) नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. 

राज्यभरात तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharti Exam) पार पडत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण आणि इतर गैरप्रकार समोर येत आहे. यामध्ये आरोपी गणेश गुसिंगेसह मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याने तातडीने या सगळ्या प्रकारावर चौकशी समिती नेमावी, यासाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमधील (Competitive Examination Coordination Committee) परीक्षा देणारे उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्यात याचिका दाखल करणार आहेत. 

चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणार

दहा ते पंधरा दिवसाच्या ठराविक वेळेत चौकशी समितीने आपला अहवाल समोर ठेवावा, तोपर्यंत तलाठी भरती प्रक्रिया स्थगित करुन आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील पाऊले उचलावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयासमोर ठेवणार आहे. यामध्ये मेहनत, कष्ट करुन अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यामुळे तातडीने ठराविक वेळेत या सर्व प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांकडून केली जाणार आहे.

न्यायालयाने चौकशी समितीची स्थापना करण्याची विनंती करणार : निलेश गायकवाड, सदस्य, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती 

"आम्ही येत्या तीन ते चार दिवसात या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, यामध्ये आम्ही राज्य सरकारला स्पर्धा परीक्षा घेण्यासंदर्भाच्या उपाययोजना सुचवल्या होत्या. त्याची अंमलबजावणी पुढील परीक्षांमध्ये केली जावी, हे आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहोत. तलाठी भरती परीक्षेत एकाच शिफ्टमधील परीक्षेचा पेपर फुटला असं तरी आतापर्यंत समोर आलं असलं तरी आमच्या माहितीनुसार इतर काही पेपर फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात चौकशी समितीचे गठन न्यायालयाने करावं अशी विनंती आम्ही याचिकेमध्ये करणार आहोत," असं तलाठी भरती परीक्षेचा उमेदवार आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सदस्य निलेश गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget