Maharashtra SSC Result 2023 : गुणपत्रिका 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करा; पण शाळेत मिळणार 14 जूनला!
Maharashtra SSC Result 2023 live updates : ऑल द बेस्ट! उद्या दहावीचा निकाल, एबीपी माझावर झटपट पाहण्याची सुविधा; प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर
LIVE
Background
ऑल द बेस्ट! उद्या दहावीचा निकाल, एबीपी माझावर झटपट पाहण्याची सुविधा; प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर
Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, त्याचप्रमाणे 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही दहावीचा निकाल सर्वात आधी पाहता येणार आहे. यंदा निकालाची प्रत डाऊनलोड करण्याचा ऑप्शन देखील 'एबीपी माझा'च्या साईटवर देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
Maharashtra SSC Result 2023 : कुठे पाहणार निकाल
महाराष्ट्र बोर्डानं निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वरही पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करावं लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोडही करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे.
Maharashtra SSC Result 2023 : एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
Thane SSC News: ठाण्यातील गौतमीला दहावीत 100 टक्के मार्क
Thane SSC News: ठाणे शहरातील बी केबीन परिसरात राहणाऱ्या गौतमी सहस्त्रबुद्धे या विद्यार्थीनाला इयत्ता दहावीच्या परिक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहे. गौतमी ही ए. के. जोशी शाळेची विद्यार्थींनी आहे. ती विज्ञान या शाखेत शिकून भविष्यात इंजिनिअर होण्याची इच्छा तिने व्यक्त केली. 90 टक्क्यांच्या वर गुण मिळतील पण 100 टक्के मिळतील असे वाटले नव्हते असे गौतमीने सांगितले. गौतमीची आई गौरी आणि वडील संदीप यांनी तीच्या यशाचे कौतुक केले आहे.
Maharashtra SSC Result 2023 : गुणपत्रिका 'एबीपी माझा'च्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करा; पण शाळेत मिळणार 14 जूनला!
Nashik News : नाशिक शहरातील औदयोगिक संघटनांचा बंद मागे , उदय सामंत यांची मध्यस्थी
Nashik News : निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावरील झालेला हल्ला प्रकरणी आज नाशिक शहरातील औद्योगिक वसाहत बंद ठेवण्यात येणार होती. मात्र हा बंद मागे घेण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्र पाठवून मध्यस्थी केली आहे. येत्या 7 व 8 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.