![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय
Maharashtra SSC Result 2024 at https://mahresult.nic.in/ : दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दहावीचा निकाल डिजीलॉकवर देखील पाहता येणार आहे.
![Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय Maharashtra SSC 10th Result 2024 declare on mahresult nic in today if website any problem then check result on digi locker app information in marathi Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्यास निकाल कसा पाहणार? जाणून घ्या पर्याय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/26007120c1f6070facac7b9ab1db68141716782915050989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MSBSHSE SSC Result 2024 मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE Pune ) दहावीचा निकाल (SSC Result) आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करणार आहे. निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती दिली जाईल. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होणार असल्याचं म्हटलं होतं, त्याप्रमाणं बोर्डाकडून निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार असून बोर्डानं यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी जाहीर केली आहे. या वेबसाईटवर निकाल पाहताना काही तांत्रिक अडचणी आल्यास दुसऱ्या पद्धतीनं निकाल कसा पाहायचा हे देखील विद्यार्थ्यांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
दहावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर जाहीर होणार?
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
वेबसाईटवर निकाल पाहताना अडचणी निर्माण झाल्यास पर्याय काय?
महाराष्ट्रातील 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. बोर्डाकडून दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर केला जाणार आहे. दहावीचा निकाल वेबसाईटसह डिजीलॉकर अॅपमध्ये देखील निकाल पाहू शकतात.
डिजीलॉकरवर निकाल कसा पाहणार?
स्टेप 1 : डिजीलॉकरच्या वेबसाईटला भेट द्या किंवा डिजीलॉकर अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा.
स्टेप 2 : महाराष्ट्र बोर्डाचा पर्याय निवडा आणि त्यानंतर दहावीचा निकाल हा पर्याय निवडा
स्टेप 3 : आवश्यक असलेली माहिती भरा
स्टेप 4 : तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल. यानंतर तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळाद्वारे कामकाज केलं जातं. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागाद्वारे दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यात येतात.
विद्यार्थी पालकांची उत्सुकता शिगेला
बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदा दहावीचा निकाल मे महिन्यातच जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षेचं आयोजन 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान करण्यात आले होते.
संबंधित बातम्या :
बेस्ट ऑफ लक! आज दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता जाहीर होणार, कुठे पाहाल?
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)