Maharashtra News : विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी, गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार
Maharashtra school News : राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
पुणे : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेणार आहे,
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, माझे वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कमी वेळात पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. परंतु हा मोठा निर्णय असून हे माझ व्यक्तिगत मत आहे. याबद्दल शिक्षक संघटना, संस्था चालक त्यांच्याशी बोलणार आणि मग त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्य सरकारकडून जर अशा निर्णय घेण्यात आला तर घरी येऊन पुन्हा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू आहे. आगामी शालेय शिक्षण वर्षात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुशे मुलांच्या पाठीवरील ओझे कमी होणार आहे.
गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेत असताना पालक शिक्षक संस्थाचालक या सगळ्यांना विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालक संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे. सुनील चौधरी म्हणाले, विद्यार्थी घरी गृहपाठ करतात म्हणजेच पालकांकडून त्यांच्या अभ्यासाची उजळणी सुद्धा घेतली जाते. आता गृहपाठच बंद करायचा तर नेमकं नवीन काय करायचं ? यामुळे विद्यार्थ्यांची उजळणी कशा पद्धतीने होणार ? याचा सुद्धा विचार करावा लागेल. पुस्तकामध्येच वहीचे पान जोडायचे असा सुद्धा विचार शिक्षण विभाग करते मात्र त्यामुळे खरंच दप्तराचे वजन कमी होणार आहे का याबाबत कुठलाही ठोस असा निर्णय नाही, संभ्रम आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI