HSC Result : बारावीचा निकाल काही तासांवर, विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटशिवाय निकाल आणखी कुठं पाहता येणार, जाणून घ्या
Maharashtra HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे.
पुणे : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून राहिलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result) उद्या दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) याबाबत माहिती देण्यात आली आहे. बारावीचा निकाल पाहण्यासाठी बोर्डाकडून वेबसाईट जाहीर करण्यात आलेल्या आहेत.बारावीचे विद्यार्थी (HSC Students) maharesult. nic. in या वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. तर, राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahasscboard.in या वेबसाईटवर एकत्रित निकाल पाहयाला मिळेल. याशिवाय बोर्डाकडून आणखी वेबसाईट जाहीर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं प्रमुख दोन वेबसाईटशिवाय आणखी काही वेबसाईट जाहीर केल्या आहेत. मंडळाच्या वेबसाईटसह इतर वेबसाईटवर निकाल पाहणं विद्यार्थ्यांना सोपं जाणार आहे. मंडळाकडून इतर वेबसाईट जाहीर करण्यात आल्यानं वेबसाईटच्या सर्व्हरवर येणारा ताण कमी होऊ शकतो.
मंडळाच्या वेबसाईट
1. mahresult.nic.in
2. www.mahahsscboard.in
मंडळाच्या वेबसाईटशिवाय निकाल कुठं पाहावा?
3. http://hscresult.mkcl.org
4. https://results.digilocker.gov.in
5. http://results.targetpublications.org
डिजीलॉकरचा वापर करा, निकालपत्र हरवण्याच्या टेन्शनपासून मुक्त व्हा
बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना डिजीलॉकर वर देखील उपलब्ध होणार आहे. डिजीलॉकवर विद्यार्थी बारावीचा निकाल जतन करुन ठेवू शकतात. बारावीच्या निकालाची छापील प्रत पुढील काळात चुकून हरवल्यास त्यावेळी डिजीलॉकवर जतन करुन ठेवण्यात आलेल्या प्रतीचा तातडीनं आवश्यकता असल्यास वापर करु शकता.
15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांच्या वतीनं नोंदणी करण्यात आलेली होती. बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.
दरम्यान, बारावीचा निकाल उद्या उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत संबंधित महाविद्यालयांमध्ये काही दिवसानंतर उपलब्ध होईल. त्यानंतर विद्यार्थी पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्याचा वापर करु शकतात. सीबीएसईनं यापूर्वीच दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केला आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra HSC Result : मोठी बातमी, बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून महत्त्वाची अपडेट
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI