एक्स्प्लोर

शिक्षकांसाठी खुशखबर! राज्यातील 2 हजार 384 शिक्षक होणार आता केंद्रप्रमुख; कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

Education News: राज्यातील 34  जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384  केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Education News: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहेत. दरम्यान यावेळी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384  केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी 6 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, महिन्याच्या अखेर ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना देखील स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख होण्याची संधी मिळणार आहे. 

केंद्रप्रमुख हा प्रशासन व शिक्षकांमधील दुवा असतो. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र प्रमुखांच्या अंतर्गत 13 ते 16 शाळा येतात. विशेष म्हणजे केंद्रप्रमुखांची 50 टक्के पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरली जातात. तसेच उर्वरित 50 टक्के पदे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 'केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023' द्वारे भरण्यात येणार आहेत. तर जि.प. शिक्षकांनी पदोन्नतीची संधी मिळाल्यामुळे अनेकांनी तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक शिक्षकांकडून परीक्षेची तयारी देखील केली जात आहे. त्यामुळे आपल्याला देखील केंद्रप्रमुख पद मिळावे अशी अपेक्षा अनेक शिक्षकांची आहे. 

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पण या पदासाठी अर्ज करण्यास 50 वर्ष वयाची अट घातल्यामुळे अनेक शिक्षक परीक्षेच्या संधीपासून वंचित राहणार आहेत. तर 50 वर्षावरील शिक्षकांना परीक्षेची संधी मिळावी अशी मागणी पुढे येत आहे. तसेच ती मागणी मान्य न झाल्यास परीक्षेलाच उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी काही शिक्षकांनी सुरु केली आहे.

केंद्रप्रमुखासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

नाशिक 122, नंदुरबार 33, धुळे 40, जळगाव 80, अमरावती 69, बुलढाण 65, अकोला 42, वाशिम 35, यवतमाळ 90, नागपूर 68, वर्धा 43, भंडारा 30, गोदिया 42, गडचिरोली 50, चंद्रपूर 66, छत्रपती संभाजीनगर 64, हिंगोली 34, परभणी 43, जालना 53, बीड 78, लातूर 50, धाराशिव 40, नांदेड 87, ठाणे 47, रायगड 114, पालघर 75, पुणे 153, अहमदनगर 123, सोलापूर 99, कोल्हापूर 85, सांगली 67, सातारा 111, रत्नागिरी 125 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 61 जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार आहे. 

ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार

केंद्रप्रमुख होण्यासाठी ऑनलाईन परीक्षा शिक्षकांना द्यावी लागणार आहे. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. तर या 200 गुणांमध्ये दोन विभाग असून, पहिल्या विभागात बुद्धिमत्ता चाचणी आणि अभियोग्यता हा घटक असेल. दुसऱ्या विभागात शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह याविषयीचा अभ्यासक्रम असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

पाठ्यपुस्तकांमधील वह्यांच्या पानांवर नेमकं काय लिहायचं? शिक्षण विभागाच्या नव्या मार्गदर्शन सूचना जारी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget