Vijay Wadettiwar : मोदी पुन्हा सत्तेत येतील हा आनंद 2 दिवसांचा; एक्झिट पोलच्या अंदाजावरुन विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला
Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजावरुन विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.
Vijay Wadettiwar on ABP Cvoter Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 Result) निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजील संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यामुळे राज्यात आणि देशात सत्ता परिवर्तन होणार का? राज्यात पक्ष फुटीनंतर वेगळे काही चित्र असेल का? भाजपचे 45 प्लसचे स्वप्न महाराष्ट्रात भंगणार का, भाजपच्या घोडदौडीला महाराष्ट्र लगाम लावणार का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं ही येत्या 4 जून रोजी मिळणार आहेत.
मात्र त्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच या एक्झिट पोलच्या अंदाजावरुन विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. मोदी पुन्हा सत्तेत येतील हा आनंद केवळ 2 दिवसांचा आहे. त्यामुळे त्याचा आनंद घेत असल्याचे म्हणत विजय वडेट्टीवारांचा भाजपला टोला लगावला आहे.
10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात
हा एक्झिट पोल आहे, निकाल नाही. त्यामुळे जेव्हा निकाल येईल तेंव्हा मोदी सरकार बदललेले दिसेल. सध्याघडीला 10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. भाजपने दिलेला 400 पारचा नारा आता हवेत विरला आही. त्यामुळे त्यावर फार काही बोलायची गरज नाही. मागील 10 वर्षे जनतेने या सरकारचा त्रास सहन केला. विकासाची निवडणूक हरतो आहे हे ज्यावेळी दिसून आले म्हणून भाजपने ही निवडणूक धर्मावर नेली. मात्र अंतिम निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा एक्झिट पोल चे निकाल बदललेले दिसेल, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला आहे.
महाराष्ट्रात आम्ही 35 च्या आसपास असू- विजय वडेट्टीवार
एक्झिट पोल नेहमीच सत्ताधाऱ्यांचे काम करतात. त्यातील काही बरेही असतात, मात्र अनेकदा हे पोल चुकलेही आहे. त्यामुळे कुठे तरी निवडणुकीच्या संदर्भातील अंतिम निकाल हा 4 जूनला स्पष्ट होईल. काही एक्झिट पोल महविकास आघाडीच्या कमी जागा दाखवत आहे. तर काही ठिकाणी जास्त दाखवत आहेत. मात्र आम्ही 35 च्या आसपास महाराष्ट्रात असू, कर्नाटकातही आम्ही पुढे राहू. असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही
ठाकरे आणि शिवसेना हे समीकरण आहे.त्यामुळे शेती एकाची अन् पेरणी दुसऱ्याची, असे होत नाही. कोणी कितीही पक्ष फोडले, चिन्ह पळवले, तरी असे पक्ष फोडणाऱ्यांना ही मोठी चपराक दिसत आहे. राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि अजित दादांना कुठेही रिस्पॉन्स नव्हता, यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही, घर फोडणे, पक्ष फोडणे, खिडकी पळवणे, जो धुमाकूळ महायुतीने घातला त्यापासून लोक प्रचंड नाराज असल्याचेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूरमध्ये आम्ही जिंकत आहोत, याचा आनंद आहे. 2019 मध्ये एकमेव जागा आली होती, तो काँग्रेसचा गड आम्ही यंदा देखील राखत आहोत. तर गडचिरोलीची जागा 1 लाख मतांच्या अंतराने जिंकत आम्ही आहो, उमेदवारांचा जनसंपर्क आणि सरकारविरोधी राग गडचिरोली आमच्या ताब्यात पडतो आहे. असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI