जॉब माझा : नाबार्ड आणि मुंबई मेट्रोमध्ये काम करण्याची संधी; कुठे आणि कसा अर्ज कराल?
नाबार्डमध्ये एकूण 162 जागांसाठी भरती आहेत. तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मुंबईमध्ये एकूण 19 जागांसाठी भरती आहे.

नाबार्ड बँकेत विविध पदांसाठी 162 जागांवर भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही नोकरीची संधी आहे.
नाबार्ड बँक
एकूण जागा – 162
पहिली पोस्ट – असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A)
- एकूण जागा – 148
- शैक्षणिक पात्रता - 50 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/ B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA
- वयोमर्यादा – 21 ते 30 वर्ष
दुसरी सर्वाधिक जागा असलेली पोस्ट आहे. - मॅनेजर (ग्रेड B ) (RDBS)
- एकूण जागा – 7
- शैक्षणिक पात्रता - 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, 3 वर्षांचा अनुभव
- वयोमर्यादा – 25 ते 32 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2021
यासोबतच असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) या पोस्टसाठी 5 जागा आहेत. आणि असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) साठी 2 जागा आहेत. तुम्हाला याची सविस्तर माहिती वेबसाईटवर पाहायला मिळेल. संपूर्ण देशभरात ही भरती होतेय. तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट - www.nabard.org (या वेबसाईटवर गेल्यावर career notices वर क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक पोस्टविषयी विस्ताराने जाहीरातीची लिंक मिळेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मुंबई
- एकूण जागा – 19
- पहिली पोस्ट – डेप्युटी इंजिनियर (उपअभियंता)
- एकूण जागा – 7
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेज मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी
दुसरी पोस्ट – ज्युनियर इंजिनियर (कनिष्ठ अभियंता)
- एकूण जागा – 12
- शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेज मधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी/ पदविका, 5 वर्षांचा अनुभव
- वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. त्यावर गेल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. Pdf फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL – लाईन 3 ट्रान्सिट ऑफीस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई 400051
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























