(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICAI CA Admit Card 2022 : CA फायनल आणि इंटरमिजिएट प्रवेशपत्र जारी, 'या' लिंकवर जाणून घ्या माहिती
ICAI CA Admit Card 2022 : परीक्षेसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार ICAI च्या अधिकृत साइट eservices.icai.org वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
ICAI CA November Admit Card 2022 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने ICAI CA नोव्हेंबर 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. हे प्रवेशपत्र अंतिम आणि इंटरमिजिएट अभ्यासक्रमांसाठी जारी करण्यात आले आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार ICAI च्या अधिकृत साइट eservices.icai.org वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. अंतिम परीक्षा 1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घेण्यात येईल. त्याच वेळी, इंटरमिजिएट परीक्षा 2 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार आहेत.
ऑफलाइन पद्धतीने परीक्षा
या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. दरम्यान, ICAI CA फाउंडेशन परीक्षा 2022 साठी मॉक टेस्ट पेपर मालिका आयोजित करेल. फाउंडेशनच्या डिसेंबर 2022 च्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्ट पेपर घेण्यात येईल. पेपर सिरीज 1 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे
1: ICAI च्या अधिकृत साईटला eservices.icai.org वर भेट द्या.
2: ICAI CA नोव्हेंबर अॅडमिट कार्ड 2022 फायनल किंवा इंटरमीडिएट लिंकवर क्लिक करा.
3: लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
4: तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर प्रदर्शित केले जाईल.
5: प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.
6: पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.
कॅट परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच-
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर लवकरच CAT 2022 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. वेळापत्रकानुसार, CAT 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी 27 ऑक्टोबर 2022 रोजी अधिकृत साइटवर उपलब्ध असेल. उमेदवारांसाठी CAT 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक संध्याकाळी 5 वाजल्यापासून सक्रिय केली जाईल. विद्यार्थ्यांनी त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI