एक्स्प्लोर

PM Narendra Modi : 2022 चा अर्थसंकल्प शिक्षण क्षेत्राचा चेहरा कसा बदलणार? पंतप्रधानांनी दिली महत्वपूर्ण माहिती

या वेबिनारमध्ये,अर्थसंकल्प 2022 चा शिक्षण क्षेत्रावर "सकारात्मक परिणाम" कसा होईल यावर चर्चा करण्यात येतेय.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वेबिनार सत्राला संबोधित करत आहेत. या वेबिनारमध्ये, अर्थसंकल्प 2022 चा शिक्षण क्षेत्रावर "सकारात्मक परिणाम" कसा होईल यावर चर्चा करण्यात येतेय. पंतप्रधानांनी सकाळी ट्विट करून या वेबिनारची माहिती दिली. आपल्या भाषणादरम्यान मोदी म्हणाले, "आजचे तरुण भविष्याचे नेते आहेत, ते भविष्याचे निर्माते आहेत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला सक्षम बनवणे म्हणजे भारताचे भविष्य मजबूत करणे होय.

शिक्षण क्षेत्राशी संबंधित पाच गोष्टी

पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान 2022 च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधित पाच गोष्टींवर जास्त भर देण्यात आला आहे.

-प्रथम, 'आपल्या शिक्षण पद्धतीचा विस्तार करून तिची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

-दुसरे म्हणजे कौशल्य विकास. देशात डिजिटल स्किलिंग इकोसिस्टम असायला हवी, उद्योगाच्या मागणीनुसार कौशल्य विकास व्हायला हवा, इंडस्ट्री लिंकेज अधिक चांगलं असायला हवं, याकडे लक्ष दिलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

-तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे शहरी नियोजन आणि रचना. भारतातील प्राचीन अनुभव आणि ज्ञान आज आपल्या शिक्षणात समाविष्ट करणे आवश्यक आहे. मोदी म्हणाले की,

-चौथी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीयीकरण - जागतिक दर्जाची परदेशी विद्यापीठे भारतात आली पाहिजेत, जी आपली औद्योगिक क्षेत्रे आहेत, जसे की गिफ्ट सिटी, फिनटेकशी संबंधित संस्थांनी तेथे यावे, यालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे. डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण व्यवस्था जिवंत राहते

-पाचवी महत्त्वाची बाब म्हणजे 'एव्हीजीसी' (अ‍ॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक), यामध्ये सर्वांना रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत, एक मोठी जागतिक बाजारपेठ आहे:

डिजिटल कनेक्टिव्हिटीने जागतिक महामारीच्या काळात शिक्षण व्यवस्था जिवंत ठेवली

पंतप्रधान म्हणाले की, आजच्या युगात डिजिटल कनेक्टिव्हिटीने या जागतिक महामारीच्या काळात आपली शिक्षण व्यवस्था जिवंत ठेवली आहे. भारतात डिजिटल डिवाईन कसे झपाट्याने कमी होत आहे ते आपण पाहत आहोत. ते म्हणाले की, देशातील ई-विद्या असो, वन क्लास वन चॅनल असो, डिजिटल लॅब असो किंवा डिजिटल विद्यापीठ असो, अशा शैक्षणिक पायाभूत सुविधा तरुणांना खूप मदत करणार आहेत. भारतातील खेड्यापाड्यातील गरीब, दलित, मागास, आदिवासी या सर्वांना शिक्षणाचे उत्तम समाधान देण्याचा हा प्रयत्न आहे. नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटी हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील एक अनोखे आणि अभूतपूर्व पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मला डिजिटल विद्यापीठात ती शक्ती दिसत आहे की, हे विद्यापीठ आपल्या देशातील जागांची समस्या पूर्णपणे दूर करू शकते. पंतप्रधान म्हणाले की आज जागतिक मातृभाषा दिन देखील आहे. मातृभाषेतील शिक्षण मुलांच्या मानसिक विकासाशी निगडीत आहे. वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण अनेक राज्यांमध्ये स्थानिक भाषांमध्ये सुरू झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget