CBSE Board 12th Exam 2021: सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत उद्या मोठा निर्णय येण्याची शक्यता
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल रविवारी, 23 मे रोजी सर्व राज्यातील शिक्षणमंत्री आणि सचिवांसमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत सीबीएसई 12 वीच्या बोर्ड परीक्षा 2021 यासह आगामी परीक्षांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
![CBSE Board 12th Exam 2021: सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत उद्या मोठा निर्णय येण्याची शक्यता CBSE Class 12 Board Exam 2021 Education Minister to hold high level meeting tomorrow with states to discuss 12th Board Exams 2021 Class 12 Exam CBSE CBSE Board 12th Exam 2021: सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत उद्या मोठा निर्णय येण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/22/2fd0b0e2ad6e0b243ff063f9cff68895_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
CBSE Board 12th Exam 2021: कोरोना महामारीमुळे 12 वी बोर्ड परीक्षांचं काय होणार? असा प्रश्न सध्या विद्यार्थी आणि पालकांसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी साडेअकरा वाजता केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल सर्व राज्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. यात 12 वी बोर्ड परीक्षा आणि आगामी परीक्षांवर चर्चा होणार आहे. यात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणत्री आणि राज्य परीक्षा मंडळाच्या शिक्षण सचिवांचा समावेश आहे. या बैठकीचा अजेंडा 12 वी बोर्ड परीक्षा 2021 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या इतर प्रवेश परीक्षा घेण्याच्या प्रस्तावांवर चर्चा करणे आहे.
भारतात वाढत्या कोरोना विषाणूच्या घटनांचा विचार करता, सीबीएसई 12 वीच्या बोर्ड परीक्षा 2021 संदर्भात यापूर्वी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी 17 मे रोजी बैठक बोलविली होती. परंतु, त्यावेळी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय महिला आणि बालमंत्री स्मृती इराणी हेदेखील या वर्च्युअल बैठकीस उपस्थित राहतील.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम करणारा कोणताही निर्णय सर्व राज्य सरकारे आणि हितचिंतकाशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर घ्यावा अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. या उच्चस्तरीय बैठकीला राज्य सरकारचे सर्व शिक्षणमंत्री आणि सचिव उपस्थित राहतील आणि आपले म्हणणे मांडतील असे शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. उद्या वर्च्युअल बैठक होणार आहे.
शिक्षणमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर आणि हितचिंतकांच्या सूचनांनंतर निश्चितपणे 12 वी बोर्ड परीक्षा 2021 चा निर्णय येण्याची शक्यता आहे दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरही सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलंय.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)