एक्स्प्लोर

​CBSE Class 12 Result 2022 : CBSE परीक्षेत मुलींची बाजी! तान्या सिंगने मिळवले 500 पैकी 500 गुण, केला परफेक्ट स्कोर

​CBSE Class 12 Result 2022 : CBSE परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून तान्या सिंग या विद्यार्थीनी पैकीच्या पैकी मार्क मिळवले आहे. परफेक्ट स्कोर केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

CBSE Class 12 Result 2022: सीबीएसई बोर्डाने 12 वीचा निकाल जाहीर केला आहे.  CBSE परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून तान्या सिंग या विद्यार्थीनी पैकीच्या पैकी मार्क मिळवले आहे. परफेक्ट स्कोर केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बुलंदशहर येथे राहणाऱ्या तान्या सिंगने या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. तान्या सिंग दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. तर, नोएडाची एमिटी स्कूलची विद्यार्थिनी युवक्षी विग हिनेही पूर्ण 500 गुण मिळवले आहेत.

किमान 33% गुण मिळणे आवश्यक
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) यावर्षी 26 एप्रिल ते 15 जून 2022 दरम्यान इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या. CBSE इयत्ता 12 टर्म 2 च्या परीक्षेत 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते, जे परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. CBSE इयत्ता 12 च्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये किमान 33% गुण मिळणे आवश्यक आहे. 12वी परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल तपासू शकतात आणि त्यांच्या शाळेचा कोड, रोल नंबर आणि जन्मतारीख लॉग इन करून गुणपत्रिका डाउनलोड करू शकतात.

मुलींनी मारली बाजी 

यावर्षी 14,44,341 विद्यार्थ्यांनी CBSE 12वी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 14,35,366 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर 13,30,662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्वांना मिळून उत्तीर्णतेची टक्केवारी 92.71 टक्के आहे. दुसरीकडे, सीबीएसई परीक्षेत यंदा मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. यंदा 94.54 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 91.25 टक्के मुलांना यश मिळाले आहे.

टॉपर्सची लिस्ट जाहीर नाही
यंदा मुले 91.25 टक्के तर मुली 94.54 टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी टॉपर्सची लिस्ट जाहीर केली जाणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या 0.1 टक्के विद्यार्थ्यांनाच ही गुणवत्ता प्रमाणपत्रे दिली जातील.

एसएमएसद्वारे निकाल पाहता येईल
विद्यार्थी त्यांचे CBSE निकाल 2022 10वी आणि 12वीचे निकाल एसएमएसद्वारे देखील मिळवू शकतात. यासाठी तुमचा इयत्ता 10वी किंवा 12वीचा रोल नंबर टाका आणि हा एसएमएस 7738299899 वर पाठवा.

'असा' तपासा निकाल 
CBSE निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in आणि cbseresults.nic.in व्यतिरिक्त, विद्यार्थी UMANG अॅप, डिजीलॉकर आणि एसएमएसद्वारे देखील तपासू शकतात. विद्यार्थी त्यांचे निकाल parikshasangam.cbse.gov.in वर देखील पाहू शकतात. 

-विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
-यानंतर CBSE 10वी/12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता तुमचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक टाका.
-यानंतर 10वी आणि 12वी 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
-शेवटी निकालाची प्रिंट काढा.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget