पेन ड्राईव्ह हरवलेल्या बातमीला नवे वळण; प्रियकराने पाकिस्तानातील व्यक्तीला हाताशी धरुन रचला कट
रमेश याने फेसबुक वरून एका पाकिस्तानी व्यक्तिशी मैत्री केली होती. याच पाकिस्तानी व्यक्तीचा व्हाट्सअप नंबर देखील त्याने मिळवला. त्यानंतर व्हाट्सअप कॉलिंग करून त्याने या पाकिस्तानातील मुशर्रफ नावाच्या व्यक्ती बरोबर संबंध वाढवले.
ठाणे : एका तरुणीच्या भविष्याचा व्हिलन बनलेल्या पेन ड्राईव्ह या बातमीला वेगळेच वळण लागले. तिच्याच मित्राने पाकिस्तानच्या एका फेसबुक फ्रेंडची मदत घेऊन तिच्याकडून पैसे उकळण्यासाठी हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रारदार तरुणीच्या मित्राला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक करून वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले आहे. या संपूर्ण प्रकारात तरुणाची नको त्या गोष्टीसाठी असलेली चलाखी दिसून आली आहे.
हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे ते पाहूया. वर्तक नगर पोलीस स्टेशन मध्ये एका 29 वर्षीय तरुणीने अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार तिला व्हाट्सअॅपवर एका अज्ञात व्यक्तीने भूतकाळात घडलेल्या तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधाची व्हिडीओ क्लिप पाठवली होती. एक लाख रुपयांची मागणी करत ती चित्रफित वायरल करण्याची धमकी दिली. त्या तरुणीने तिच्या प्रियकराला यासंदर्भात विचारले असता त्याने आपल्याकडे असलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये ती चित्रफित असल्याचे सांगून तो पेन ड्राईव्ह आपल्याकडून गहाळ झाल्याचे तिला सांगितले होते. यानंतर ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आणि ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने यासंदर्भातील तपास सुरू केला होता. हा अज्ञात व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीला या तरुणीचा नंबर कसा सापडला या संदर्भातला हा तपास होता.
ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने आपल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीतील परमेश भैरी या 28 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. हाच तरुण फिर्यादी तरुणीचा प्रियकर देखील कळाले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या प्रियकराने सर्व कट कारस्थान पोलिसांना सांगितले. परमेश याने फेसबुक वरून एका पाकिस्तानी व्यक्तिशी मैत्री केली होती. याच पाकिस्तानी व्यक्तीचा व्हाट्सअप नंबर देखील त्याने मिळवला. त्यानंतर व्हाट्सअप कॉलिंग करून त्याने या पाकिस्तानातील मुशर्रफ नावाच्या व्यक्ती बरोबर संबंध वाढवले. त्यानंतर त्याला व्हाट्सअप वर आपली प्रेयसी म्हणजेच फिर्यादी तरुणी आणि आपले प्रेम संबंधाचे व्हिडीओ क्लिप्स देखील पाठवले. त्यानंतर त्याला हे व्हिडिओ क्लिप्स तरुणील व्हाट्सअॅपवर पाठवून तिच्याकडून एक लाख रुपये मागण्यास देखील सांगितले. सोबत तरूणीच्या मित्र-मैत्रिणींची आणि नातेवाईकांचे नंबर देखील त्याने या पाकीस्तानातील मुशर्रफ नावाच्या व्यक्तीला दिले. अशाप्रकारे चलाखीने तरुणींकडून पैसे उकळण्याचा त्याचा डाव होत. मात्र ठाणे खंडणी विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपला गुन्हा आता कबूल केला आहे. या परमेश भैरी ला वर्तक नगर पोलिसांच्या हवाले खंडणीविरोधी पथकाने केली आहे.
संबंधित बातम्या :