Nagpur Crime : ब्लॅकमेल करून महिला वकिलावर अत्याचार, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
तिला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही पीडितेचा आरोप आहे. विरोध केल्यास कमलेश जातीवाचक शिवीगाळही करायचा. कमलेशचा मित्र आदित्य यानेही पीडितेच्या घराखाली येऊन तिला शिवीगाळ केली.

नागपूर: वकीलाने ब्लॅकमेल करीत सहकारी महिला वकिलावरच (Female Lawyer) वारंवार अत्याचार केल्याचे खळबळजणक प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी (Gittikhadan Police) वकीलासह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कमलेश वाघदरे (46, रा. सोनेगाव) आणि त्याचा मित्र आदित्य चौधरी अशी आरोपींची नावे सांगण्यात येतात.
कमलेश आणि आकारनगर येथील रहिवासी 46 वर्षीय महिला दोघेही पेशाने वकिल आहेत. दोघेही जिल्हा व सत्र न्यायालयात (Nagpur District and Sessions Court) सराव करतात. यामुळे एकमेकांचे परिचितही आहेत. कमलेश अनेकदा पीडितेच्या घरी जायचा. याच दरम्यान कमलेशने तिचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल (pornographic photos) करण्यास सुरुवात केली, असा पीडितेचा आरोप आहे. 24 मार्च 2014 ते 27 मार्च 2022 दरम्यान घरी आणि कार्यालयात वारंवार अत्याचार केला.
पतीला जीवे मारण्याची धमकी
कमलेशने तिला अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचाही पीडितेचा आरोप आहे. विरोध केल्यास कमलेश जातीवाचक शिवीगाळही करायचा. कमलेशचा मित्र आदित्य यानेही पीडितेच्या घराखाली येऊन तिला शिवीगाळ केली. आदित्यने गुंड आणून तिच्या पतीला मारहाण केली आणि तिच्या मुलीला घरातून पळवून नेण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाला जीवे (life threat) मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कमलेश आणि आदित्यविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास (Investigation) सुरू केला आहे.
वाचा Cyrus Mistry : टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील नेमका वाद काय? 'या' सहा आरोपांमुळे मिस्त्रींना सोडावं लागलं होतं अध्यक्षपद
साप, वन्यप्राण्यांचे छायाचित्र व्हायरल, होणार कारवाई
नागपूरः गेल्या काही दिवसांपासून शहरात अनुसूची एकमध्ये असलेल्या पक्ष्यांसह सापांना जेरबंद करुन त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार झपाट्याने वाढू लागले आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असल्याने हा प्रकार बळावला आहे. शुक्रवारी अशीच एक घटना उघडकीस आली आहे. याबाबत सूचना मिळताच वनविभाग अॅक्टिव्ह झाला असून प्रकरणाची सत्यता तपासून कारवाई करणार असल्याचे समजते. सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात हे जखमी झालेले आणि इतरही कारणामुळे जेरबंद करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्या उपचारासाठी महत्त्वाचे ठिकाण झालेले आहे. काही उत्साही वन्यप्रेमी वन्यजीवाला वाचविण्यासाठी घटनास्थळी जातात आणि पक्षी, साप, सरपटणाऱ्या प्राण्यांना जेरबंदज करुन वाचवितात. दरम्यान थेट सेंटरला न येता माध्यमांकडे जात त्याचे फोटोसेशन करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असल्याने वनविभाग कारवाई करण्याच्या तयारीत आहे.























