एक्स्प्लोर

Virar Crime : भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, विरार हादरलं

Virar Crime : विरार पूर्वेतील शिरगाव खदानीत RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंडल अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासमोर ही घटना घडली.

पालघर : जिल्ह्यातील विरारमध्ये भरदिवसा घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील खदानीत RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही घटना मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच घडली. या हल्ल्यात प्रभाकर पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात खदान मालक महेश भोईर याचे नाव समोर आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

RTI Activist Murder : RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची निर्घृण हत्या

मृत व्यक्तीची ओळख आत्माराम पाटील अशी झाली आहे. ते माहितीच्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणारे RTI कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Shirgaon Quarry : शिरगाव खदानीत दुपारी दीडच्या सुमारास घटना

मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदानी परिसरात गेले होते. ते व्हॅगनआर कारने घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 

प्राथमिक माहितीनुसार, खदान मालक महेश भोईर याने त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर झालेल्या वादातून आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.

Virar Police Investigation : विरार पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

Motive Behind Case : हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

ही हत्या खदानीशी संबंधित वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे विरार आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनॉलॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
Embed widget