(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑडिशनच्या नावाखाली फसवणूक, अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, वसईत चौघांविरोधात गुन्हा
विरार : ऑडिशनच्या नावाखाली 18 वर्षीय तरुणीचं अश्लील चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार वसई विरारमध्ये (vasai virar) घडला आहे.
विरार : ऑडिशनच्या नावाखाली 18 वर्षीय तरुणीचं अश्लील चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार वसई विरारमध्ये (vasai virar) घडला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
ऑडीशनच्या नावाखाली तरुणीचं अश्लील चित्रिकरण करुन ते इंटरनेट आणि वेबसाईटवर प्रदर्शित केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.चित्रपट, मालिकामध्ये एक्स्ट्रा काम करणा-या तरुणीची चार जणांनी फसवणूक आणि बदनामी केली. तिचे अश्लील चित्रिकरण केले. ते इंटरनेटवर व्हायरल केल्याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरूणी ही 18 वर्षांची आहे. अभिनेत्री बनण्यासाठी ती तरुणी मध्य प्रदेशहून मुंबईत आली होती. सध्या ती वसईत भाड्याच्या घरात रहाते. हिंदी चित्रपटात आणि मालिकामध्ये ती एक्स्ट्रा कलाकाराचे काम करते. एक नोव्हेंबर रोजी आरोपींनी त्या तरुणीला व्हॉटसअॅप कॉल केला होता. फोन करुन आरोपींनी तरुणीला चित्रपटात काम देण्याच्या बाहण्याने ऑडिशनसाठी बोलवले. अर्नाळा बीच समोरील एका हॉटेलच्या कॉटेजमध्ये तरुणीला बोलावले होते.
तक्रारीत तरुणीने काय सांगितलेय ?
18 वर्षीय तरुणी कामाच्या आशेपोटी दिनांक 2 नोव्हेबर रोजी अर्नाळा येथे गेली. तिथे तिला प्रॉडक्शन कंपनीचे चार जण भेटले. त्यात एक दिग्दर्शक, एक कॅमेरामन, एक अभिनेता तसेच एक महिला मेकअप आर्टीस्ट अशा चौघांचा समावेश होता. चौघांनी तिला एका एका लॉजमध्ये ऑडिशनसाठी नेले. तिथे तिला काही दृश्ये चित्रित करायची आहेत असे सांगून तिला फसवून अश्लील दृश्य देण्यास भाग पाडले.ही दृ्श्ये केवळ ऑडिशनचा भाग असून तिचा कुठे वापर केला जाणार नाही, असे सांगितले. माञ तिची दृश्ये विविध अश्लील संकेतस्थळावर प्रसारीत केली गेली. याबाबत तिने संबंधित लोकांना फोन केला. मात्र त्यांचे मोबाईल नंबर बंद होते. आपली फसवणूक आणि बदनामी झाल्याचं त्या तरुणीला लक्षात आले. त्यानंतर तरुणीने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीनंतर अर्नाळा पोलिसांनी भा.द.वि.कलम 420, 501, 34 सह आय.टी.अॅक्ट 2000 चे कलम 66(ई), 67(अ) अन्वये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता गुन्हे शाखा 3 करत आहे. या प्रकरणात नवोदित तरुणींची फसवणूक करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.