एक्स्प्लोर

Vasai Girl Death: क्यों किया ऐसा मेरे साथ? लोखंडी पान्याचे 15 घाव घालून प्रेयसीला संपवलं, नागरिक मोबाईल शुटिंगमध्ये बिझी

Crime News: आरती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत होती. तरीही रोहित तिच्या डोक्यात लोखंडी पान्याने घाव घालत होता. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आरतीचा जीव वाचला असता, असा आरोप आरतीच्या कुटुंबीयांनी केला आहे

वसई: मुंबईपासून काही अंतरावर असलेला वसई परिसर मंगळवारी एका हत्येच्या घटनेने हादरला. वसईच्या (Vasai) गौराईपाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. रोहित रामनिवास यादव (वय 29) या तरुणाने आरती रामदुलार यादव (वय 22) हिची निर्घृणपणे हत्या (Vasai Girl Murder) केली. रोहितने एका भल्यामोठ्या लोखंडी पान्याने आरतीच्या शरीरावर 15 जोरदार घाव घातले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. हा सगळा प्रकार सुरु असताना आजुबाजूचे नागरिक बघ्याच्या भूमिकेत राहिले. अनेकांनी या घटनेचे व्हीडिओ शुटिंग केले. मात्र, कोणीही आरतीच्या मदतीला धावून गेले नाही. आरतीचा मृत्यू झाल्यानंतरही रोहित तिच्या मृतदेहावर एकापाठोपाठ पान्याने घाव घालत होता. 

आरतीवर हल्ला करण्यापूर्वी रोहित , "क्यों किया ऐसा मेरे साथ?", असे ओरडत होता. यानंतर त्याने आरतीवर लोखंडी पान्याने हल्ला केला. आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हादेखील तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले नाही. यावेळी काहीजणांनी रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित त्यांच्याच अंगावर लोखंडी पाना घेऊन धावून गेला. तो शेवटपर्यंत शेजारीच असलेल्या दुकानाच्या पायरीवर बसून आरतीच्या मृतदेहाकडे बघत राहिला.  

आरतीच्या बहिणीचा पोलिसांवर आरोप

आरती आणि रोहित यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये बिनसल्याने आरती रोहितला टाळत होती. याचाच राग रोहित यादवच्या मनात होता. आरती वसई पूर्वेकडील एका खासगी कंपनीत कामाला होती. 8 जूनलाही रोहितने आरतीला मारहाण केली होती. त्याने आरतीचा मोबाईल फोडला होता. यानंतर आरतीने आचोळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी रोहितला केवळ समज देऊन सोडून दिले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझी बहीण वाचली असती, असा आरोप आरतीच्या बहिणीने केला.

मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आरतीने आम्हाला रोहित आणि तिच्यातील प्रेमप्रकरणाविषयी सांगितले नव्हते. आम्ही रोहित विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता. 9 जूनला रोहितला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. त्यावेळी रोहितांनी पोलिसांनी आपल्या भाषेत समज दिली. पोलिसी खाक्या दाखवताच आरतीने पोलिसांना थांबवले. आमचे आम्ही मिटवून घेऊ, असे तिने पोलिसांनी सांगितले. तरीही आम्ही 149 ची नोटीस देऊन रोहित यादव विरोधात कारवाई सुरु केली होती, अशी बाजू पोलिसांनी मांडली.

आणखी वाचा

6 वर्ष प्रेमसंबंध, महिन्यापूर्वी ब्रेकअप, संशयाचं भूत, वसईत भर रस्त्यात प्रेयसीला संपवलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget