नात्याला काळीमा, अश्लील व्हिडीओ पाहून बहिणीवर अत्याचार, 19 वर्षीय भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Uttar Pradesh Crime News : मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. उत्तर प्रदेशमध्ये (uttar Pradesh News) तर बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय.
Uttar Pradesh Crime News : मुली आज खरंच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. उत्तर प्रदेशमध्ये (uttar Pradesh News) तर बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. एका 19 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आहेत. मोबाईलवर पॉर्न पाहून (Crime News) सख्ख्या भावाने बहिणीसोबत अतिप्रसंग केला. त्यानंतर गळा दाबून तिचा खून केला. चुलत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी पोलिसांनी (Police) भावाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील कासंगज येथे नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. आरोपीचं नाव संजू असल्याचं समोर आलेय. या प्रकारानंतर कासंगजमध्ये खळबळ माजली आहे.
मोबाईलवर पॉर्न पाहून अश्लील कृत्य -
3 फेब्रुवारी रोजी कासंगज येथे ही धक्कादायक घटना घडली. 19 वर्षीय संजू मोबाईलवर पॉर्न पाहत होता. त्यावेळी त्याने 17 वर्षीय लहान बहिणीसोबत अश्लील कृत्य केले. बहिणीवर अत्याचार केल्यानंतर संजू घाबरला. त्याने 17 वर्षीय बहिणीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत घटनास्थळावरुन पळ काढला. मृत मुलीच्या चुलता राधेश्याम याने संजू विरोधात स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केला. घटनेचं गांभीर्य पाहून पोलिसांनी संजूला तात्काळ बेड्या ठोकल्या.
गुन्ह्याची कबूली -
पोलिसांनी संजूला सापळा रचून अटक केले. पोलिसांनी खाकी दाखवल्यानंतर संजूने गुन्ह्याची कबुली दिली. संजूने पोलिसांना सांगितलं की, आई नातेवाईकाकडे गेली होती. घरात बहिणीसोबत एकटाच होता. त्यावेळी पॉर्न पाहत होतो. त्यानंतर बहिणीसोबत अत्याचार केले. याबाबत कुणाला कळू नये, त्यामुळे तिचा गळा दाबून खून केला. घाबरल्यामुळे मी तेथून पळ काढला.
अत्याचार केल्यानंतर बहिणीला संपवलं -
या धक्कादायक प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. एसपी अर्पाण रजत कौशिक म्हणाल्या की, 4 फेब्रुवारी रोजी पटियाला स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. त्यानंतर घरातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. विशेष पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. संजूने सख्या बहिणीवर अत्याचार केल्यानंतर गळा दाबून तिला संपवलं.
24 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या -
संजूने बहिणीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तेथून पळ काढला होता. मृत मुलीच्या चुलत्याने संजूची पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून 24 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
आणखी वाचा :
पुण्यातील हिरे व्यापाऱ्याला गुवाहाटीत संपवलं, बंगाली जोडप्याला अटक, लव्ह ट्रॅन्गलमधून घेतला जीव