एक्स्प्लोर

उत्तर प्रदेश ATS पथक मुंबईत, भिवंडीतून तिघांना अटक; दहशतवादी कारवायांतील सहभागाचा तपास

27 ऑगस्टच्या तपासात भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखोंची रक्कम फिलिस्तीन देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले.

ठाणे : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) शनिवारी उशिरापर्यत छापेमारी करत भिवंडीतील (bhiwandi) विविध भागातून तीन तरुणांना अटक केली. या तरुणांनी अंदाजे 3 लाख रुपये गोळा करून ती रक्कम फिलिस्तीन देशात पाठवल्याचा आरोप आहे. खळबळजनक म्हणजे या तिघांवर संशयास्पद दहशतवादी (Terrorist) कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय असून तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (22 वर्षे), रा. सहारा अपार्टमेंट्स, ताहेरा मॅरेज हॉलजवळ, भिवंडी) अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (22 वर्षे), रा. गुलजार नगर, भिवंडी) जैद नोटियार अब्दुल कादिर (22 वर्षे), रा. वेताळ पाडा, भिवंडी, अशी अटक केलेल्या तरुणाची नावे आहेत.

एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की, 27 ऑगस्टच्या तपासात भिवंडीतून उत्तरप्रदेश राज्यात लाखोंची रक्कम फिलिस्तीन देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर यूपी एटीएस एक पथक शुक्रवारी भिवंडीत दाखल होऊन तपास सरू केला असता दिवसभर या तरुणावर पळत ठेवून शनिवारी दुपारच्या सुमरास भिवंडी शहरातील गुलजार नगर भागातील एका इमारतीत पथकाने अचानक छापे मारी करत अबू सुफियान तजम्मुल अन्सारी या तरुणाला राहत्या घरातून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर दोन साथीदार मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन आणि जैद नोटियार अब्दुल कादिर याब दोघांची नावे सांगितल्यावर पथकाने दोघांनाही शांतीनगर आणि निज्मापुरा पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर दहशतवाद्यांना रक्कम गोळा करून पाठवत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी रात्री उशिरा या तिन्ही तरुणांना पुढील तपासासाठी लखनौच्या एटीएस कार्यलयात नेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथ तालुक्यात नेवाळी नाका परिसरामधून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली होती. त्यावेळीही स्थानिक हिल लाईन पोलिसांकडून आफताबचे घर शोधून काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करत त्याला अटक करून दिल्लीत पुढील तपासासाठी नेण्यात आले. आता त्या पाठोपाठ भिवंडीतील या तिघांवर देश विघातक संशयास्पद कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे, आणि तपास यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

2 वर्षांपूर्वी तिघांना अटक

दरम्यान, गेल्या दोन वर्षापूर्वी नवरात्री व दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सर्तक होऊन ठिकठिकाणी छापेमारी करीत होते. त्यावेळी, देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थ साहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या 3 पदाधिकाऱ्याना भिवंडी शहरातून ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांसह विविध गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले होते. तर भिवंडी तालुक्यातील पडघा गावाच्या हद्दीतून इसीस च्या आठ ते दहा दहशतवाद्यांना काही महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. एकंदरीतच भिवंडी शहर व ग्रामीण भागात दशतवादीसह पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या वास्तवसह देश विघातक कारवाईचे कनेक्शन उघड झाल्याने ठाणे जिल्हासह मुंबईच्या सुरक्षेच्या दुष्टीने धोक्याचे असल्याची चर्चा नागरिक करताना दिसत आहे.

हेही वाचा

मुंबईकरांना गुडन्यूज, नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर आता केवळ अर्ध्या तासात; महामार्गातील मोठा अडथळा दूर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget