एक्स्प्लोर

संतती प्राप्तीसाठी जादूटोणा, चिमुकलीचं अपहरण करुन बलात्काराचा प्रयत्न, हत्या करुन फुफ्फुसं काढली

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. संतती प्राप्तीसाठी जादूटोणा आणि तंत्र-करण्यासाठी एका सहा वर्षीय दलित मुलीची हत्या करण्यात आली आहे. तसेच चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न केला आहे.

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे दिवाळीच्या दिवशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जादूटोणा आणि तंत्र-मंत्रासाठी एका सहा वर्षीय दलित मुलीची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक ग्रामीण बृजेश श्रीवास्तव यांनी सोमवारी सांगितलं की, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अंकुल कुरील (20) आणि बीरन (31) नावाच्या व्यक्तींनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर गळा घोटून तिची हत्या केली.

जादूटोणा करण्यासाठी मुलीची फुफ्फुसं काढली

त्यांनी सांगितलं की, हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपिंनी चिमुकलीची फुफ्फुसं काढून मुख्य आरोपी पुरुषोत्तमला दिली होती. पुरुषोत्तमला जादूटोणा करण्यासाठी मुलीच्या या अवयवांची गरज होती. श्रीवास्तव यांनी सांगितलं की, 'पुरुषोत्तमला रविवारीच अटक करण्यात आली होती. तर त्याच्या पत्नीवरही या प्रकरणात मदत केल्याचा संशय असल्यांमुळे ताब्यात घेण्यात आलं होतं.'

पुत्रप्राप्तीसाठी जादूटोण्याची मदत

श्रीवास्तव यांनी सांगितलं की, पुरुषोत्तमने सुरुवातीला पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कसून चौकशी केल्यानंतर त्याने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पुरुषोत्तमने पोलीस चौकशीत सांगितल्यानुसार, त्याचं लग्न 1999 मध्ये झालं होतं. परंतु, आतापर्यंत त्याला मुलबाळ नव्हतं. आपत्य मिळवण्यासाठी त्याला जादूटोणा करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यासाठी एका लहान मुलीच्या फुफ्फुसांची गरज होती. त्यासाठी त्याने आपला भाचा अंकुल आणि त्याचा मित्र बीरन यांना शेजारच्या मुलीचं अपहरण करण्यासाठी तयार केलं होतं.

पोलीस उपनिरीक्षण (डीआईजी) डॉ. प्रीतिंदर सिंह यांनी सांगितलं की, घाटमपूर येथील एका गावात राहणारं एक कुटुंब शनिवारी दिवाळीच्या पूजेची तयार करत होतं. तेवढ्यात अचानक त्यांची सहा वर्षांची मुलगी घरात नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की, कुटुंबातील सदस्यांनी तिला शोधलं पण तरी ती सापडली नाही. रविवारी सकाळी मंदिराजवळून जाणाऱ्या गावकऱ्यांना मुलीचा मृतदेह दिसून आला.'

आणखी एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'मुलीच्या शरीरावर असणाऱ्या जखमांवरून तिची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असल्याचं समोर आलं. तसेच मुलीचे हात आणि पायांवर रंग लागला होता. तसेच चप्पल आणि कपड्यांसह तिच्या वस्तूनही जवळच्याच एका झाडाजवळून ताब्यात घेण्यात आल्या.

फॉरेंसिक विशेषतज्ज्ञांची घेणार मदत

जादूटोण्यासाठी मुलीची हत्या झाल्या प्रकरणी डीआयजी म्हणाले की, या प्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेंसिक विशेषतज्ज्ञांची आणि श्वान पथकांची मदत घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी सदर घटनेबाबत शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबियांना पाच लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच योगी आदित्यनाथ यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रिया ताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रिया ताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision 2024 : मनसेसह युती करण्यात नातं आडयेतं? काकाबद्दल आदित्य म्हणतात..TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रिया ताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रिया ताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
22 वर्षीय मुलीच्या लग्नाचा विचार मनातच राहिला, पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
22 वर्षीय मुलीच्या लग्नाचा विचार मनातच राहिला, पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
Embed widget