एक्स्प्लोर

जेवणाचं बिल देण्याच्या वादातून टोळक्यांची मॅनेजरला हाणामारी; उल्हासनगरमधील घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar Crime News : जेवणाचा बिल देण्याच्या वादातून ढाब्यावर जोरदार हाणामारी झाली असून मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Ulhasnagar Crime News : जेवणाचं बिल देण्याच्या वादातून ढाब्यावर जोरदार हाणामारी झाली आहे. बिल देण्याच्या वादातून ढाब्याच्या मॅनेजरलाच पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे. उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ढाब्यावर ही घटना घडली. सदर प्रकरणी ढाब्याच्या मॅनेजरनं पोलिसांत धाव घेतली. पण पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केलेली नसून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. 

उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ढाब्यावर काही जणांच्या टोळक्यामध्ये जोरदार हाणामारीची घटना घडली. जेवणाचा बिल देण्याच्या वादातून ढाब्याच्या मॅनेजरला पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली असताना देखील उल्हासनगर हीललाईन पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

देवराम वारिंगे आणि त्याचे पाच सहा सहकारी अंबरनाथ तालुक्यातील पालेगाव एमआयडीसी भागातील सागर ढाब्यावर जेवण्यासाठी गेले होते. यावेळी देवराम वारिंगे आणि ढाब्याचा मॅनेजर यांच्यामध्ये जेवणाचा बिल देण्यावरून वाद-विवाद झाले. देवराम वारिंगे आणि त्याच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं जेवणाच्या बिलाच्या वादातून धाब्यातच लाठ्या-काठ्यांनी मॅनेजरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यानंतर धाब्याचा मॅनेजर उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी पोलिसांनी मात्र कोणतीही ठोस कारवाई न फक्त अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', Sanjay Raut दोन महिने राजकारणातून बाहेर; PM Modi म्हणाले 'लवकर बरे व्हा'.
Maharashtra Politics: 'पुढच्या आठवड्यात आचारसंहिता, निधी मिळणार नाही', Ajit Pawar यांचा इशारा
Rohit Arya Death: मृत्यूचं गूढ वाढलं! तीन डॉक्टरांकडून दोन तास शवविच्छेदन, संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग
Fake Audition Racket : 'तुमचा मुलगा किडनॅप झालाय असं वागा', Rohit Arya च्या ऑडिशनमधील धक्कादायक प्रकार उघड
Phaltan Suicide Case: 'तिन्ही Mobileमधील Triangle भयानक', तो लोकांसमोर आणण्यासारखा नाही- जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget